प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 12:40 IST2020-09-06T12:21:48+5:302020-09-06T12:40:41+5:30

काय म्हणाले रियाचे वकील सतीश मानेशिंदे ?

rhea chakraborty ready for arrest as this is witch hunt says her lawyer | प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

ठळक मुद्देअलीकडे एका मुलाखतीत रियानेही सुशांत आधीपासून नियमितपणे गांजाचे सेवन करायचा, असा दावा केला होता.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक केल्यानंतर एनसीबीने आपला मोर्चा रिया चक्रवर्तीकडे वळवला आहे. अशात रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.
रिया अटकेसाठी तयार आहे. त्यांनी अंतरिम जामीन दिलेला नाही. प्रेम करणे गुन्हा असेल तर रिया अटकेसाठी तयार आहे, असे सतीश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी रिया व शौविक यांच्यावरचे ड्रग्जचे आरोप खोडून काढले होते. रिया व शौविक यांनी कोणतेही ड्रग्ज घेतलेले नाही. ते ब्लड टेस्टसाठी तयार आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

कोर्टात मानेशिंदे काय म्हणाले?
कोर्टाने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. शौविकच्या चॅटमधून त्यांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. तथापि त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी शनिवारी कोर्टासमोर युक्तिवाद करताना वेगळाच दावा केला. सुशांत सुरुवातीपासूनच ड्रग्ज घ्यायचा. 20 वर्षांचा असतानापासून सुशांत मानसिक समस्यांनी पीडित होता. रियाला भेटण्याच्याआधीपासून तो ड्रग्ज घ्यायचा. 

‘केदारनाथ’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यानही तो ड्रग्ज घ्यायचा. त्यावेळी रिया त्याच्या आयुष्यात नव्हती. सुशांतची बहीण प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, सुशांत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घ्यायचा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्यावरून रिया व सुशांतमध्ये वाद झाला होता, असाही मानेशिंदे यांचा दावा आहे. शौविककडून कोणतही ड्रग्ज जप्त झालेली नाही़ रिया व शौविकवरचे सगळे आरोप निराधार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे..
अलीकडे एका मुलाखतीत रियानेही सुशांत आधीपासून नियमितपणे गांजाचे सेवन करायचा, असा दावा केला होता.

Web Title: rhea chakraborty ready for arrest as this is witch hunt says her lawyer