बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 19:40 IST2021-06-24T19:39:46+5:302021-06-24T19:40:45+5:30
सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून या दोघी एकत्र आल्या तर घरात दंगलच होईल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे.

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात
बिग बॉस 15 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनची घोषणा झाल्यापासून या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची रंगली आहे. सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून या दोघी एकत्र आल्या तर घरात दंगलच होईल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
अभिनेता सुशांत सिंग रजपूतचे गेल्या वर्षी निधन झाले. त्याने राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पवित्र रिश्ता या मालिकेत काम करत असताना त्याचे अंकिता लोखंडे सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. पण काही वर्षांनी त्या दोघांनी ब्रेकअप केले. त्यानंतर काही काळाने रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात आली. रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात संशय घेतला गेला होता. इतकंच नव्हे तर यामधून पुढे आलेल्या ड्रग्स कनेक्शन मधून तिला अटकसुद्धा करण्यात आली होती.
सुशांतच्या पूर्वप्रेयसी अंकिता आणि रिया या बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. रियाने बिग बॉसच्या घरात येण्यास होकार दिल्यास अंकिताला विचारण्यात येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे या दोघी घरात एकत्र आल्या तर दंगलच होईल अशा प्रतिक्रिया नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे देत आहेत.