Revealed:गोविंदाची पहिली आणि मोठी मुलगी टीना नाही,खुद्द चिचीने केलेला भावनिक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:25 IST2017-12-21T10:55:04+5:302017-12-21T16:25:04+5:30

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा.आपला डान्स,कॉमेडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनयाने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमात ...

Revealed: Govinda's first and elder daughter is not Tina, an emotional disclosure of the chinchilla | Revealed:गोविंदाची पहिली आणि मोठी मुलगी टीना नाही,खुद्द चिचीने केलेला भावनिक खुलासा

Revealed:गोविंदाची पहिली आणि मोठी मुलगी टीना नाही,खुद्द चिचीने केलेला भावनिक खुलासा

लिवूडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा.आपला डान्स,कॉमेडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनयाने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमात नंबर वन बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं,कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने सा-यांची मनं जिंकली.त्यामुळे गोविंदा रसिकांचा लाडका चिची बनला.विरारचा छोरा अशी ओळख असणा-या गोविंदाचं आयुष्य मुंबापुरीतच गेलंय.त्याच्या जीवनाविषयी ब-याच गोष्टी कायमच ऐकायला मिळतात.मात्र गोविंदाच्या आयुष्याविषयी काही गोष्टी अजूनही समोर आलेल्या नाहीत.टीना म्हणजेच नर्मदा ही गोविंदाची मोठी लेक आहे हे सा-यांनाच माहिती आहे.मात्र असं असलं तरी टीना ही गोविंदाची थोरली लेक नाही.कारण टीनाआधी गोविंदाला एक मुलगी झाली होती.मात्र अवघ्या ४ महिन्यांची असताना तिचा मृत्यू झाला होता.खुद्द चिचीने याचा एका मुलाखतीत हा भावनिक खुलासा केला आहे.ती एक प्रीमॅच्युअर बेबी होती,त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं गोविंदाने सांगितले.याशिवाय कुटुंबातील जवळच्या ११ व्यक्तींचा मृत्यू आपण पाहिला आहे असंही चिचीने म्हटले आहे.मुलीसह वडील,आई,दोन भाऊ,मेहुणे आणि बहिणीचा मृत्यू मी पाहिला आहे असं गोविंदाने या मुलाखतीत सांगितले.या काळात कंपनी बंद पडल्याने आणि उत्पन्नाचे कोणतंही दुसरं साधन नसल्याने त्यांच्या मुलांना आपणच लहानाचे मोठे केल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.या काळात भावनिक आणि आर्थिक दबाव होता असंही चिचीने यावेळी सांगितले आहे.

Also Read:‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता गोविंदा! घटस्फोटापर्यंत पोहोचले होते प्रकरण!!

८० व ९० च्या दशकात गोविंदा अभिनेत्री नीलम हिच्या प्रेमात आकंठ बुडला होता.पडद्यावर या दोघांची जोडी प्रचंड गाजली होती. या जोडीने डझनावर सिनेमे केलेत. ‘इल्जाम’च्या सेटवर गोविंदा व नीलम यांची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि याचदरम्यान नीलम व गोविंदा एकमेकांच्या जवळ आलेत. 

Web Title: Revealed: Govinda's first and elder daughter is not Tina, an emotional disclosure of the chinchilla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.