लग्नाच्या २४ वर्षांनी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ, गोड क्षणाचा व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:11 IST2025-11-13T11:09:31+5:302025-11-13T11:11:11+5:30
आशुतोष राणा यांचा ५८वा वाढदिवस खऱ्या अर्थाने खास ठरला. या वाढदिवशी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालत लग्न केलं.

लग्नाच्या २४ वर्षांनी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ, गोड क्षणाचा व्हिडीओ समोर
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. २००१ मध्ये मराठमोळ्या रेणुका शहाणे राणा घराण्याच्या सून झाल्या. २५ मे २००१ रोजी रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी लग्नाच्या बेडीत अडकत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या २४ वर्षांनी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
आशुतोष राणा यांचा १० नोव्हेंबरला वाढदिवस होता. अभिनेत्याच्या ५८व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यांच्या वाढदिवसाला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली होती. आशुतोष राणा यांचा ५८वा वाढदिवस खऱ्या अर्थाने खास ठरला. या वाढदिवशी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालत लग्न केलं. या बर्थडे पार्टीतील त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची पहिली भेट ही एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत आशुतोष राणा हे रेणुका शहाणे यांच्या प्रेमात पडले होते. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत.