रेमो डिसुझा बनवणार म्युझिक व्हिडिओ, त्यासाठी हवीय नवीन डान्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 16:58 IST2019-02-09T16:58:04+5:302019-02-09T16:58:21+5:30

भारतातील सर्वात लोकप्रिय कोरियोग्राफर व दिग्दर्शक आगामी नवीन म्युझिक व्हिडीओसाठी नवीन महिलेचा शोध घेत आहेत.

Remo D'Souza, the music video that will create the new Dancer | रेमो डिसुझा बनवणार म्युझिक व्हिडिओ, त्यासाठी हवीय नवीन डान्सर

रेमो डिसुझा बनवणार म्युझिक व्हिडिओ, त्यासाठी हवीय नवीन डान्सर

भारतातील सर्वात लोकप्रिय कोरियोग्राफर व दिग्दर्शक आगामी नवीन म्युझिक व्हिडीओसाठी नवीन महिलेचा शोध घेत आहेत. रेमोने आपल्या इन्स्टाग्रामवर ही घोषणा केली असून त्यात नमूद केले आहे की, तो त्याच्या आगामी नवीन म्युझिक व्हिडिओसाठी नवीन महिला शोधत आहे.

रेमो डिसुझा म्हणाला, मी एक नवीन महिला चेहरा शोधत आहे जी एक चांगली नृत्य सादर करीत आहे. 


ऑडीशन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला 30 महिलांना प्रवेश मिळेल आणि त्यातून निवडलेल्या एका नव्या चेहऱ्यासोबत नवा म्युझिक व्हिडीओ असेल. रेमो डिसुझाचा आगामी संगीत व्हिडिओ हॅपी प्रोडक्शन्स आणि हाय ऑन डान्सवर आधारित आहे.
हॅपी प्रोडक्शन्सचे एमडी अपर्णा बॅनर्जी यांनी सांगितले की, आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत आणि आमचा म्युझिक व्हिडिओ रसिकांना नक्कीच भावेल, अशी आम्हाला आशा आहे. हाय ऑन डान्स हा एक मंच आहे जो संपूर्ण भारतातील नृत्य करणाऱ्यांसाठी अनेक संधी तयार करणार आहे. त्याचबरोबर मोठ्या डिजिटल रिऍलिटी डान्स शोची योजना आखत आहोत. 

Web Title: Remo D'Souza, the music video that will create the new Dancer