‘संजू’च्या रिलीजपूर्वी हॉलिवूडच्या या ‘हिरो’ने उडवली रणबीर कपूरची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 10:50 IST2018-06-26T10:50:29+5:302018-06-26T10:50:29+5:30

 राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत रिलीज होतो आहे. पण या रिलीजपूर्वी यातील मुख्य अभिनेता रणबीर कपूर ...

Before the release of 'Sanju', the 'Hero' of Hollywood film 'Ranbir Kapoor!' | ‘संजू’च्या रिलीजपूर्वी हॉलिवूडच्या या ‘हिरो’ने उडवली रणबीर कपूरची झोप!

‘संजू’च्या रिलीजपूर्वी हॉलिवूडच्या या ‘हिरो’ने उडवली रणबीर कपूरची झोप!

 
ाजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत रिलीज होतो आहे. पण या रिलीजपूर्वी यातील मुख्य अभिनेता रणबीर कपूर याची झोप उडाली आहे आणि याला कारणीभूत आहे, तो हॉलिवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलॉन. रणबीर कपूर भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण  सिल्वेस्टर हाही भारतात कमी लोकप्रीय नाही. त्यामुळेच रणबीरला धडकी भरली आहे. सिल्वेस्टरचा ‘एस्केप प्लान2’ हा हॉलिवूडपटही येत्या शुक्रवारीचं रिलीज होतो आहे. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर  ‘संजू’ विरूद्ध ‘एस्केप प्लान2’ असा सामना रंगणार आहे. मुळात याचमुळे रणबीरची झोप उडाली आहे. यावर्षांत हॉलिवूड चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांना बॉक्सआॅफिसवर जोरदार टक्कर दिली आहे. हे बघता, ‘एस्केप प्लान2’ला ‘संजू’पेक्षा कुठल्याही दृष्टिने कमी लेखता येणार नाही. ‘एस्केप प्लान2’ हा एक अ‍ॅक्शनपट आहे. त्यामुळे विशेषत: मेट्रो सिटीमध्ये हा चित्रपट ‘संजू’वर भारी पडू शकतो.


‘संजू’मध्ये अभिनेता संजय दत्तच्या ख-या आयुष्यातील काही ठळक घटना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर ‘एस्केप प्लान2’ प्रेक्षकांना जबरदस्त अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर मिस्ट्री व सस्पेन्स पाहता येणार आहे. अमेरिकेच्या ‘द टॉम्ब’ तुरुंगातून फरार झालेल्या कैद्यांची योजना यात दिसणार आहे. रे ब्रेस्लिन, सिल्वेस्टर स्टेलॉन आणि त्याचे मित्र तुरुंग फोडून पळून जाण्यात यशस्वी होतात का, हे या चित्रपटात बघायला मिळणार आहे. आता हा प्लान लोकांना आवडतो की संजू, ते बघूच.

Web Title: Before the release of 'Sanju', the 'Hero' of Hollywood film 'Ranbir Kapoor!'