‘लवरात्री’ रिलीज होण्याआधी ‘स्टार’ झाला सलमानचा मेहुणा आयुष शर्मा! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 12:03 IST2018-03-20T06:33:01+5:302018-03-20T12:03:01+5:30
सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याचा डेब्यू सिनेमा ‘लवरात्री’ची शूटींग जोरात सुरु आहे. खरे तर चित्रपट रिलीज व्हायला अद्याप बराच अवकाश आहे. पण त्याआधीच आयुष ‘स्टार’ झालायं.
.jpg)
‘लवरात्री’ रिलीज होण्याआधी ‘स्टार’ झाला सलमानचा मेहुणा आयुष शर्मा! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ!!
स मान खानचा मेहुणा आयुष शर्मा याचा डेब्यू सिनेमा ‘लवरात्री’ची शूटींग जोरात सुरु आहे. खरे तर चित्रपट रिलीज व्हायला अद्याप बराच अवकाश आहे. पण त्याआधीच आयुष ‘स्टार’ झालायं. होय, आयुष स्टार झालायं. अलीकडे ‘लवरात्री’च्या शूटींगसाठी आयुष अलाहाबादेत पोहोचला. सेटवर पोहोचताच, लोकांनी त्याला एकच गराडा घातला. आयुषसोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. एका पाठोपाठ एक असे अनेक चाहते आयुषसोबत सेल्फी घेऊ लागलेत. पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच इतकी मोठी फॅन फॉलोर्इंग पाहून कुणाला आनंदाचे भरते येणार नाही? आयुष यामुळे कमालीचा सुखावला. त्याच्याइतकीच त्याची बेटरहाफ अर्पिता खान ही सुद्धा सुखावली. अर्पिताने पतीचा हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘अहमदाबादेतील हे प्रेम, उत्साह आणि मस्ती मिस करतेय. हा व्हिडिओ पाहून अवाक् झालेय. यावर कशी रिअॅक्ट करू, हेही कळत नाहीयं. किप शायनिंग हबी...’ असे अर्पिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलेय. एकंदर काय तर सलमानचा मेहुणा सध्या भलताच जोरात आहे. त्याच्या इतकाच त्याचा सिनेमाही ‘जोरात’ रिलीज व्हावा, अशी अपेक्षा करूयात.
ALSO READ : आयुष शर्मा अन् वरीना हुसैनची ‘लवरात्रि’ सुरु! पाहा पोस्टर!
आयुष शमार्चा ‘लवरात्री’ हा चित्रपट यंदा ५ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून वरीना हुसेन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट गुजरातच्या भूमीवर आधारित आहे. नवरात्री हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून, अभिनेता-अभिनेत्रीमधील प्रेमाची जुगलबंदी यात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा नरेन भट्ट यांनी लिहिली असून, अभिराज मीनावाला यांचे दिग्दर्शन आहे. सुरुवातीला आयुषबरोबर अभिनेत्री मौनी रॉय झळकणार असल्याची चर्चा होती. परंतु आयुषने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्याने तिचा पत्ता कट झाला आणि वरीनाची वर्णी लागली. या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषबद्दल तसेही तुम्हाला ठाऊक आहेच. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती आणि आता तर आयुष डेब्यू आधीच ‘स्टार’ झालाय.