Throwback : सहा बहिणींसोबत रेखा यांनी दिली पोज, व्हायरल झाला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:41 IST2019-09-24T11:39:41+5:302019-09-24T11:41:04+5:30

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  या फोटोत रेखा त्यांच्या सहा बहिणींसोबत दिसत आहेत.

rekha with her six sisters throwback picture got viral | Throwback : सहा बहिणींसोबत रेखा यांनी दिली पोज, व्हायरल झाला फोटो

Throwback : सहा बहिणींसोबत रेखा यांनी दिली पोज, व्हायरल झाला फोटो

ठळक मुद्देरेखाच्या मातोश्री पुष्पावल्ली या प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  या फोटोत रेखा त्यांच्या सहा बहिणींसोबत दिसत आहेत.
तीन वर्षांपूर्वी रेखा यांनी आपल्या बहिणींसोबत चेन्नईच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. होय, जीजी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या उद्घाटनाला या सर्व बहिणी हजर होत्या. तेव्हाचाच हा एक फोटो.
रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन आहे. रेखाशिवाय जेमिनी यांना  एकूण सात मुलेमुली (6 मुली आणि 1 मुलगा) आहेत. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत.

पुढे जेमिनी यांनी प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री पुष्पावल्लीसोबत दुसरे लग्न केले. त्यांना रेखा व राधा अशा दोन मुली झाल्यात. म्हणजेच रेखा व राधा या सख्ख्या बहिणी आहेत. 


 पहिली पत्नी अलामेलू यांच्यापासून जेमिनी यांना चार मुलगी झाल्या. रेवती, कमला, जया या तीन मुली डॉक्टर आहेत, तर नारायणी ही मुलगी पत्रकार आहे. पुष्पावल्ली यांच्यापासून त्यांना दोन मुली झाल्या, त्यापैकी रेखा ही अभिनेत्री आहेत, तर राधा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. तिसरी पत्नी सावित्रीपासून जेमिनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी विजया चामुंडेश्वरी फिजिओथेरपिस्ट असून मुलगा सतीश कुमार परदेशात स्थायिक झाला आहे.

रेखाच्या मातोश्री पुष्पावल्ली या प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या. त्यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले होते.

Web Title: rekha with her six sisters throwback picture got viral

टॅग्स :Rekhaरेखा