‘वजह तुम हो’ सत्य घटनेवर आधारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:21 IST2016-12-10T17:21:56+5:302016-12-10T17:21:56+5:30

कॉम्प्युटर, क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट, सोशल मीडिया प्रोफाईल्स हॅक करणे हा आता कॉमन क्राईम झाला आहे. हा मुद्दा आता ...

'The reason you are' based on the real event | ‘वजह तुम हो’ सत्य घटनेवर आधारित

‘वजह तुम हो’ सत्य घटनेवर आधारित

म्प्युटर, क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट, सोशल मीडिया प्रोफाईल्स हॅक करणे हा आता कॉमन क्राईम झाला आहे. हा मुद्दा आता सर्वसामान्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला असला तरीही ते चित्रपटांचे कथानकही असू शकते ना.. याच धर्तीवर लेखक-दिग्दर्शक विशाल पांडे यांचा थ्रिलरपट ‘वजह तुम हो’ आधारित आहे. यात एक टेलिव्हिजन चॅनल हॅक केले जाते. कशासाठी? तर एक लाईव्ह मर्डर प्रसारित करण्यासाठी. आहे की नाही थ्रिल? सना खान, शर्मन जोशी, गुरमीत चौधरी आणि रजनीश दुग्गल हे मुख्य भूमिकेत असतील. 

विशाल पांडे यांनी मागील काही दिवसांत प्रोफेशनल हॅकर्ससाठी फिडबॅकसाठी एक स्क्रिनिंग नियोजित केली होती. यात त्यांना हॅकर्सच्या चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया हव्या होत्या. यातील एका हॅकरने दिग्दर्शकाची पाठ थोपटत त्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘ चित्रपट पाहिल्यानंतर कळाले की, हॅकर्ससंदर्भात परफेक्ट रिसर्च केलेला आहे. चित्रपटातील ट्विस्ट अ‍ॅण्ड टर्न यांच्यामुळे थ्रिलरपट पाहण्यास जास्त मजा येते. हॅकिंगचे उपयोग आणि दुरूपयोग चित्रपटातून उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. शेवटपर्यंत तुम्हाला उत्सुकता लागते की, नेमकं दोषी कोण आहे? 

                        

Web Title: 'The reason you are' based on the real event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.