शिल्पा शेट्टीला झालंय तरी काय, नवऱ्यावर चिडल्यामुळे चक्क आईस्क्रिमवर थुंकली, पाहा हा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 17:19 IST2020-05-18T17:16:30+5:302020-05-18T17:19:01+5:30

शिल्पा शेट्टी अशी विचित्र का वागली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना देखील पडलेला आहे.

This is a reason why Shilpa shetty spilt on ice cream, See this video PSC | शिल्पा शेट्टीला झालंय तरी काय, नवऱ्यावर चिडल्यामुळे चक्क आईस्क्रिमवर थुंकली, पाहा हा VIDEO

शिल्पा शेट्टीला झालंय तरी काय, नवऱ्यावर चिडल्यामुळे चक्क आईस्क्रिमवर थुंकली, पाहा हा VIDEO

ठळक मुद्देशिल्पा राजकडे आईस्क्रिम मागत आहे. पण तो तिला आईस्क्रिम द्यायला नकार देतोय. त्यावर चिडलेली शिल्पा त्या आईस्क्रिमवर चक्क थुंकताना दिसत आहे. शिल्पा आणि राजचा हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात असून घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. तसेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. शिल्पा शेट्टी तर टिक टॉकवर चांगलीच सक्रिय असून ती रोज टिक टॉकवर व्हिडिओ पोस्ट करत असते आणि तिच्या या व्हिडिओंना तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतो. आता तिने तिचा पती राज कुंद्रासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिल्पाने टिक टॉकवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत राज आईस्क्रीम खाताना दिसत आहे. पण राज एकटाच आईस्क्रिम खात आहे हे पाहून शिल्पा प्रचंड संतापत आहे. ती राजकडे आईस्क्रिम मागत आहे. पण तो तिला आईस्क्रिम द्यायला नकार देतोय. त्यावर चिडलेली शिल्पा त्या आईस्क्रिमवर चक्क थुंकताना दिसत आहे. शिल्पा आणि राजचा हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

शिल्पा नेहमीच आपल्या सोशल मीडियावर असे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. याआधीही शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावरचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत येत असते. तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती चाहत्यांशी संवाद साधत असते आणि फोटो शेअर करत असते. त्यात अलीकडेच शिल्पाचे टिक टॉकवर 15 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

‘धडकन’ आणि ‘बाजीगर’ या सदाबहार बॉलिवूड चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली शिल्पा शेट्टी ‘हंगामा 2’ या चित्रपटात लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबतच परेश रावल, प्रणिता सुभाष, मिझान जेफरी, राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: This is a reason why Shilpa shetty spilt on ice cream, See this video PSC