या कारणामुळे सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:23 IST2019-04-22T14:18:46+5:302019-04-22T14:23:49+5:30

शिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते.

This is a reason why Salman Khan went to shilpa shetty's place at midnight | या कारणामुळे सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी

या कारणामुळे सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी

ठळक मुद्देतो अनेकवेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. पण तो मला भेटण्यासाठी नव्हे तर माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करायला यायचा. माझे वडील आणि तो सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे.

शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांनी औजार, गर्वः प्राईज अँड ऑनर, फिर मिलेंगे, शादी कर के फंस गया यार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक स्टेज शो मध्ये देखील ते एकत्र थिरकताना दिसले आहेत. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमान आणि शिल्पाचे अफेअर असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात रंगली होती. या दोघांच्या अफेअरची चर्चा होण्यामागे एक खास कारण होते.

शिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी शिल्पाने सांगितले होते की, आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये काहीही नाते नाहीये. आम्ही कधी अनेक वर्षं एकमेकांना ओळखत असलो तरी आम्ही कधी डेटवर देखील गेलो नाही. सलमान हा खूपच चांगला असून त्याचे माझ्यासोबतच नव्हे तर माझ्या कुटुंबियांसोबत देखील खूपच चांगले संबंध आहेत. त्याची माझ्याप्रमाणेच माझ्या वडिलांसोबत खूपच चांगली मैत्री होती. तो अनेकवेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. पण तो मला भेटण्यासाठी नव्हे तर माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करायला यायचा. माझे वडील आणि तो सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे. मी त्यावेळी मस्तपैकी झोपलेली असायचे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटले होते. सलमान आम्हाला घरी भेटायला आला, त्यावेळी खूपच उदास होता. कित्येक मिनिटे तो टेबलावर डोके ठेवून शांत बसला होता. 

सलमान खानचा भारत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सलमान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याची जोडी कतरिना कैफसोबत जमणार आहे तर शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. शिल्पाचे लग्न राज कुंद्रा या व्यवसायिकासोबत झाले असून त्यांना वियान हा मुलगा देखील आहे.

Web Title: This is a reason why Salman Khan went to shilpa shetty's place at midnight