आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 16:18 IST2019-09-21T16:17:54+5:302019-09-21T16:18:13+5:30

आता असं समजतंय की आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या आहेत.

The reason why Aliya refuses to work with Ranbir in the film? | आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण

आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरआलिया भट यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'बाबत त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते दोघे रिलेशनशीपमध्ये आल्याचं बोललं जातं. त्या दोघांच्या ऑनस्क्रीन कामापेक्षा ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची जास्त चर्चा व्हायला लागली आहे. मात्र आता असं समजतंय की आलिया भटनेरणबीर कपूरसोबतच्या चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. चित्रपट नाकारल्यामुळे त्या दोघांमध्ये काही बिनसलं की काय अशी चर्चा होत आहे.


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिलेशनशीपमध्ये असल्याच्या वृत्तानंतर रणबीर कपूर व आलिया भटकडे काम करण्यासाठी खूप साऱ्या ऑफर्स आहेत. इंटरेस्टिंग बाब ही आहे की त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी आलेल्या ऑफर्सचा त्यांनी अद्याप स्वीकार केलेला नाही. या दोघांनी बरेच प्रोजेक्ट रिजेक्ट केले आहेत. 


आज तकच्या रिपोर्टनुसार रणबीर व आलिया ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. ते कोणताही नव्या प्रोजेक्टची निवड करण्यापूर्वी त्यांना पहायचं आहे की प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात. कारण यापूर्वी रियल लाईफ कपल आहेत त्यांना लोकांनी रुपेरी पडद्यावर चांगली दाद दिलेली नाही. याचं उदाहरण म्हणजे सैफ अली खान व करीना कपूर.


दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.

या सिनेमात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.

Web Title: The reason why Aliya refuses to work with Ranbir in the film?