​या कारणामुळे सलमान खानने अनुष्का शर्मा-विराट कोहलीच्या रिसेप्शनला नाही लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 11:22 IST2017-12-27T05:52:06+5:302017-12-27T11:22:06+5:30

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे रिसेप्शन नुकतेच धुमधडाक्यात मुंबईत झाले. अनुष्का आणि विराटने इटली येथे त्यांच्या ठरावीक मित्र ...

For this reason, Salman Khan does not want Anushka Sharma-Virat Kohli's reception | ​या कारणामुळे सलमान खानने अनुष्का शर्मा-विराट कोहलीच्या रिसेप्शनला नाही लावली हजेरी

​या कारणामुळे सलमान खानने अनुष्का शर्मा-विराट कोहलीच्या रिसेप्शनला नाही लावली हजेरी

ुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे रिसेप्शन नुकतेच धुमधडाक्यात मुंबईत झाले. अनुष्का आणि विराटने इटली येथे त्यांच्या ठरावीक मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी लग्न केले. त्यांनी लग्नानंतर एक रिसेप्शन दिल्लीत तर एक रिसेप्शन मुंबईत दिले. त्यांच्या मुंबईच्या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अनुष्काने सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तिघांसोबतही काम केले आहे. त्यामुळे ते तिघे अनुष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण केवळ शाहरुखच अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये दिसला. सलमान आणि आमिरने अनुष्काच्या रिसेप्शनला न जाणेच पसंत केले.
सलमान खान आणि अनुष्का शर्माने सुलतान या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराट यांचे ब्रेकअप झाले होते. त्या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो देखील केले होते. त्यावेळी सलमाननेच त्यांच्या दोघांमध्ये मध्यस्थी करून दिली असल्याची चर्चा होती. त्यामुळे सलमान हा विराट आणि अनुष्का या दोघांच्याही खूपच जवळचा आहे. त्यामुळे सलमान अनुष्का आणि विराटच्या रिसेप्शनला जाणार याची सगळ्यांना खात्री होती. त्यामुळे सलमान रिसेप्शनला का गेला नाही हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे.
सलमानचा आज वाढदिवस असून सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन कालपासूनच त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर सुरू आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक जण सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमानच्या फार्म हाऊसवर आहेत. सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात सलमान व्यग्र असल्याने सलमानने अनुष्का आणि विराटच्या रिसेप्शनला उपस्थिती लावली नाही असे म्हटले जात आहे.
अनुष्का आणि विराटच्या रिसेप्शनला कतरिना कैफ आवर्जून उपस्थित होती. पण ती तिथून थेट सलमानच्या फार्म हाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा करायला गेली. त्याचप्रमाणे क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने देखील रिसेप्शननंतर थेट सलमानचे फार्म हाऊस गाठले. रात्रभर सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होते. या सेलिब्रेशनमुळेच सलमान रिसेप्शनला गेला नाही असे म्हटले जात आहे. 

Also Read : अनुष्का शर्माच्या साडीची आणि ज्वेलरीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

Web Title: For this reason, Salman Khan does not want Anushka Sharma-Virat Kohli's reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.