या कारणामुळे प्रियांका चोप्रा स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर ठरली नंबर १

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 16:07 IST2018-04-28T10:37:46+5:302018-04-28T16:07:46+5:30

बॉलिवूडची अांतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्रा नेहमीच दर्जेदार काम करताना दिसते. त्यामुळेच तिची फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मोठी ...

For this reason Priyanka Chopra has been ranked number 1 on the score trades India list | या कारणामुळे प्रियांका चोप्रा स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर ठरली नंबर १

या कारणामुळे प्रियांका चोप्रा स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर ठरली नंबर १

लिवूडची अांतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्रा नेहमीच दर्जेदार काम करताना दिसते. त्यामुळेच तिची फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे आणि त्यामुळेच तर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान प्रियांकाने पटकावला आहे.
सलमान खानसोबतच्या ती करत असलेल्या ‘भारत’ या सिनेमाची घोषणा झाल्यावर गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर चर्चेचा विषय बनली होती. सलमान खान नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला आहे. त्यामुळेच सलमानसोबतच्या या चित्रपटाच्या घोषणेने प्रियांकाला डिजिटल आणि सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग सेलिब्रिटी बनवले आहे.
प्रियांका चोप्रा नंतर स्कोर ट्रेंड्सच्या यादीत आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर सोनम कपूर तिसऱ्या आणि दीपिका पादुकोण चौथ्या स्थानी आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या आठवड्याअखेर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, प्रियांकाला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्याअखेरीस ८७.४३ गुण मिळाले होते तर दुसऱ्या स्थानी असलेल्या आलिया भट्टला ५४.६७ गुण मिळाले होते.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, "प्रियांका सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहे. ट्विटर, फेसबुक, डिजिटल न्यूज, ब्रॉडकास्ट, व्हायरल न्यूज आणि सगळ्या प्रिंट प्रकाशनांमध्ये चर्चेत राहिलेल्या प्रियांका चोप्राला ८७.४३ गुणांसह बॉलिवुडची सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी होण्याचा मान मिळाला."
अश्वनी कौल पुढे सांगतात, "आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
गेल्या आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला होता. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन ठरला तर तरूणाईवर सध्या अधिराज्य गाजवणारी आलिया भट नंबर वन अभिनेत्री ठरली होती.

Also Read : वाइन पिऊन शूटिंग करणे प्रियांका चोप्राला पडले महागात!!

Web Title: For this reason Priyanka Chopra has been ranked number 1 on the score trades India list