तर 'या' कारणामुळे ऐश्वर्या राय बच्चनने राजकुमार रावसोबत इंटिमेंट सीन्स करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 04:34 AM2017-10-05T04:34:29+5:302017-10-05T10:04:57+5:30

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या मागील चित्रपटात म्हणजेच 'ए दिल है मुश्कील' मध्ये रणबीर कपूरबरोबर अनेक इंटिमेंट सीन दिले होते. ...

For this reason, Aishwarya Rai Bachchan refused to give an intimate scene with Rajkumar Rao. | तर 'या' कारणामुळे ऐश्वर्या राय बच्चनने राजकुमार रावसोबत इंटिमेंट सीन्स करण्यास दिला नकार

तर 'या' कारणामुळे ऐश्वर्या राय बच्चनने राजकुमार रावसोबत इंटिमेंट सीन्स करण्यास दिला नकार

googlenewsNext
्वर्या राय बच्चनने तिच्या मागील चित्रपटात म्हणजेच 'ए दिल है मुश्कील' मध्ये रणबीर कपूरबरोबर अनेक इंटिमेंट सीन दिले होते. पण सध्या ऐश्वर्या इंटिमेंट सीन्सपासून लांबच पळते. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्याने आपल्या आगामी चित्रपटात तिच्या अपोझिट कलाकार राजकुमार रावबरोबर इंटिमेंट सीन्स करण्यास नकार दिला आहे, लोकांचे म्हणणे आहे की तिने हा निर्णय तिच्या आधीचा चित्रपट ए दिल है मुश्किलमुळे घेतला आहे. कारण ए दिल... च्या  रिलीजनंतर ऐश्वर्या आणि रणबीरच्या  इंटिमेंट सीन्सची बरीच चर्चा झाली.

'ए दिल है मुश्कील'मधील सीन्समुळे बच्चन परिवारात नाराजी होती. अभिषेक बच्चनने  तर ऐश्वर्याचा हा चित्रपट पहिला देखील नाही आणि तसेच जया बच्चन यांच्या वक्तव्यातून त्या ऐश्वर्यावर नाराज असल्याचे स्पष्ट दिसून आले होते.  झाले असे की जया बच्चन यांना बॉलिवूडमधील वाढत्या इंटिमेंट सीन्स ह्याबद्दल विचारले असता त्यांनी  "चित्रपटामध्ये लाज नावाची गोष्ट राहिली नाही" असे त्या म्हणाल्या. जया बच्चन म्हणाल्या की "एक काळ होता जेव्हा चित्रपटात कला सादर केली जायची पण आता सगळेच बदललेले आहे. आजकाल प्रेमाला चुकीच्या पद्धतीने  मांडले जाते आणि त्याला फिल्म मेकर्स स्मार्ट वर्क असे म्हणतात, चित्रपटात लाज नावाची गोष्ट राहिली नाही. चित्रपटाच्या माध्यमातून बिसनेस करणे पहिल्या आठवड्यात १००कोटींची कमाई करणे हेच फिल्म मेकर्सचे  सध्या उद्धिष्ट असते".

ALSO READ :  आजी जया बच्चन यांच्यासोबत कधीच का दिसत नाही आराध्या बच्चन?

म्हणूनच ऐश्वर्या राय बच्चनने तिचा आगामी चित्रपट फन्ने खानमध्ये  इंटिमेंट सीन्स करण्यास नकार दिला. यात चित्रपटाच्या मेकर्सची इच्छा आहे की राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन काही इंटिमेंट सीन्स शूट करावेत पण ऐश्वर्याने त्यास नाकार दिला आहे. यात ऐश्वर्या आपल्या पेक्षा वयाने दहा वर्ष लहान असलेल्या राजकुमार रावसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ऐश्वर्या आणि राजकुमार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. यात ऐश्वर्या राय, राजकुमार राव यांच्यासह अनिल कपूर याची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: For this reason, Aishwarya Rai Bachchan refused to give an intimate scene with Rajkumar Rao.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.