या कारणामुळे सलमान खानसोबत आमिर खानने केले नाही चित्रपटात पुन्हा काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 13:28 IST2017-12-27T07:58:07+5:302017-12-27T13:28:07+5:30

सलमान खान आणि आमिर खान यांची मैत्री जग जाहीर आहे.थ्री इडियट्सच्या प्रिमीयरला सलमानने उपस्थित लावून आमिरचा आत्मविश्वास वाढवला होता ...

For this reason, Aamir has not done anything with Salman Khan again in the film | या कारणामुळे सलमान खानसोबत आमिर खानने केले नाही चित्रपटात पुन्हा काम

या कारणामुळे सलमान खानसोबत आमिर खानने केले नाही चित्रपटात पुन्हा काम

मान खान आणि आमिर खान यांची मैत्री जग जाहीर आहे.थ्री इडियट्सच्या प्रिमीयरला सलमानने उपस्थित लावून आमिरचा आत्मविश्वास वाढवला होता तर दबंगच्या स्पेशल स्क्रिनिंगला मीडियासमोर आमिरने चित्रपटाच्या तोंड भरुन कौतुक केले होते.  

या दोघांच्या करिअरला जवळपास 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांचे नावं बॉलिवूड मधल्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये शामिल आहे. आमिर आणि सलमान दोघांनी ही आपल्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोघांनी अंदाज अपना अपना सारखा सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिला आहे.     
सलमान आणि आमिरची पहिली ओळख दिग्दर्शक आदित्य भट्टाचार्यच्या घरी झाली होती. एका शॉर्ट फिल्म परोनिआच्या मेकिंगसाठी भेटलो होतो. आमिरने पहिल्यांदा या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कॅमेरा फेस केला होता.  त्यावेळी गॅलेरित जाऊन चाह पिताना खाली कार्टर रोडवर सलमान सायकल चालवत होता. त्यावेळी आदित्यने आमिरला सांगितले होते सलमान सलीम साहेबांचा मुलगा आणि त्याला चित्रपटात काम करण्याची इच्छ आहे.

अंदाज अपना अपना दरम्यान दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती. आमिरच्या म्हणण्यानुसार त्याचा सलमान सोबत काम करण्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. सलमानसोबत शूटिंग करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर अनेक वेळा सलमानने आमिर सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र आमिरने नकार दिला. आमिरने प्रत्येकवेळी ही गोष्ट मस्करीमध्ये घेतली.

ALSO READ :   ​जॅकी श्रॉफमुळे सलमान खानच्या आयुष्यात आला होता तो लाजिरवाणा क्षण... सलमान आजही विसरू शकला नाही तो दिवस

मात्र 2001 मध्ये जेव्हा आमिर खान आपल्या आयुष्यातला वाईट दिवसांमधून जात होतो. ज्यावेळी आमिर खानचा पत्नी रीना दत्तसोबत घटस्फोट होत होता. त्यावेळी त्याला सलमानेच आधार दिला होता. त्यादरम्यान आमिरला सलमानमध्ये झालेले अनेक बदल जाणवले. सलमान आता कामाची इज्जत करु लागला आहे. त्यानंतर आमिरच्या मानात असलेली सलमानची इमेज बदलून गेली. सध्या दोघे बॉलिवूडवर राज्य करत आहे. दोघांनी एकत्र जरी काम करत नसेल तरी दोघांची मैत्री जगजाहिर आहे.     

Web Title: For this reason, Aamir has not done anything with Salman Khan again in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.