खरंच की काय..! तैमूरआधीच जेहने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण, खुद्द करीना कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:13 IST2021-08-19T14:13:09+5:302021-08-19T14:13:52+5:30

तैमुर आधीच जेहने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याची सध्या चर्चा आहे.

Really ..! Kareena Kapoor herself has revealed that she has already made her Bollywood debut in Timur | खरंच की काय..! तैमूरआधीच जेहने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण, खुद्द करीना कपूरने केला खुलासा

खरंच की काय..! तैमूरआधीच जेहने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण, खुद्द करीना कपूरने केला खुलासा

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे तर कधी चित्रपटामुळे. करीना प्रमाणेच तिचे दोन्ही मुले तैमुर आणि जेह चर्चेत येत असतात. करीना जेहच्या वेळी प्रेग्नेंट असताना लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यामुळे तोदेखील लाल सिंग चड्ढा चित्रपटाचा भाग असल्याचे करीनाने एका मुलाखतीत म्हटले. त्यामुळे तैमुर आधीच जेहने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याचे म्हटले जात आहे.


बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार करीनाने सांगितले की, ती प्रेग्नेंट असताना शूटिंगसाठी पतौडी पॅलेस ते हरयाणा असा प्रवास करत होती. तसेच अप्रत्यक्षपणे जेहदेखील चित्रपटात दिसणार आहे.


‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी करीना प्रेग्नंट होती. त्यामुळे तिचा मुलगा जेह देखील चित्रपटाचा भाग असल्याचे तिने म्हटले आहे. या चित्रपटात आमिर खान आणि करीनाचे एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्याचा जेह देखील भाग होता. एनडीटीव्हीला मुलाखतीत करीनाने सांगितले की, प्रॅक्टिकली पाहायला गेले तर माझा मुलगा जेहदेखील लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा भाग होता. तो माझ्या आणि आमिर खानच्या एका गाण्याचा भाग आहे.’


प्रेग्नेंसीमध्ये शूटिंग करताना करीना बेशुद्धदेखील झाली होती. याबद्दल तिने सांगितले की,  कडक ऊन आणि गर्मीमुळे असे झाले असेल. लॉकडाउनच्या वेळेची ही गोष्ट आहे. त्यावेळी ताणदेखील खूप होता. गाडीतून बाहेर पडतादेखील येत नव्हते. मला असे वाटत होते की मी बेशुद्ध पडणार आहे.

Web Title: Really ..! Kareena Kapoor herself has revealed that she has already made her Bollywood debut in Timur