अन् ही बातमी वाचून मीडियावर जाम भडकली तापसी पन्नू, अशी काढली भडास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 16:48 IST2018-05-30T11:18:16+5:302018-05-30T16:48:16+5:30

 ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ अशा अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचा परिचय देणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या एका खास ...

Read the news and read the news on the media. | अन् ही बातमी वाचून मीडियावर जाम भडकली तापसी पन्नू, अशी काढली भडास!

अन् ही बातमी वाचून मीडियावर जाम भडकली तापसी पन्नू, अशी काढली भडास!

 
पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ अशा अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचा परिचय देणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या एका खास स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. होय, तापसी प्रचंड ‘च्युझी’ आहे़ आधी तापसीने साऊथ इंडस्ट्री गाजवली आणि आता ती बॉलिवूड गाजवते आहे. साहजिकचं या प्रवासात तिचा हा स्वभाव कायम तिच्या कामी आला आहे. कदाचित याच ‘च्युझी’ स्वभावामुळे तापसीने अगदी अचूक चित्रपट निवडले आणि पुढे याच जोरावर   ती बॉलिवूडमध्ये तरली. अलीकडे तापसीच्या याच स्वभावाला धरून एक बातमी आली. ती म्हणजे, तापसीने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास नकार दिला अशी. या बातमीनुसार, हनी त्रेहन नवाजुद्दीनला घेऊन एक क्राईम थ्रीलर बनवत आहे. या चित्रपटासाठी लीड अभिनेत्री म्हणून त्रेहन यांनी तापसीच्या नावाला पसंती दिली होती. पण तापसीने म्हणे  नवाजुद्दीन या चित्रपटात आहे, हे कळताच या चित्रपटाला नकार दिला.  या नकारामागचे कारण मात्र तिने दिले नाही.

ALSO READ : तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांच्या मुल्कचा फर्स्ट लूक आऊट

आता नवाजुद्दीन सारख्या मुरब्बी अभिनेत्यासोबत काम करण्यास तापसीने नकार दिला म्हटल्यावर अनेकांना धक्का बसला. तापसीनेही ही बातमी वाचली आणि तिचा पारा चढला. कारण तिचे मानाल तर या बातमीत जराही सत्यता नाही. मग काय, तापसीने मीडियावर संपूर्ण भडास काढली. ‘बेजबाबदार पत्रकारिता सर्वोच्चस्थानी...   लेखणीचे शोषण करण्यापूर्वी सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित लोकांशी संपर्क साधणार का?’, अशा शब्दांत तिने आपला संताप बोलून दाखवला. एकंदर काय तर तापसी जाम भडकली. आता तिच्या संतापाचा तिला अपेक्षित परिणाम होवो, अशीच कामना करूयात.
सध्या तापसी ‘मुल्क’ या चित्रपटात बिझी आहे. अलीकडे या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी झाले. यात ऋषी कपूर हेही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट २७ जुलैला रिलीज होणार आहे.

Web Title: Read the news and read the news on the media.