​दोन्ही सिनेमे हातचे गेल्याने रोजलीन खान नाराज! म्हणे, मला ‘भाभी’ म्हणू नका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:57 IST2017-12-21T08:27:53+5:302017-12-21T13:57:53+5:30

मॉडेल व अभिनेत्री रोजलीन खान तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. रोजलीन आत्तापर्यंत अनेक जाहिरातीत दिसली आहे. पण मॉडेल म्हणून कमी ...

Razleen Khan annoyed with both films gone! Say, do not call me 'Sister-in-law' !! | ​दोन्ही सिनेमे हातचे गेल्याने रोजलीन खान नाराज! म्हणे, मला ‘भाभी’ म्हणू नका!!

​दोन्ही सिनेमे हातचे गेल्याने रोजलीन खान नाराज! म्हणे, मला ‘भाभी’ म्हणू नका!!

डेल व अभिनेत्री रोजलीन खान तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. रोजलीन आत्तापर्यंत अनेक जाहिरातीत दिसली आहे. पण मॉडेल म्हणून कमी अन् अ‍ॅडल्ड कॉमिक्समधील ‘सविता भाभी’ या पात्राच्या नावानेच रोजलीनला अधिक ओळखले जाते. विक्रम बावा, महेन्द्र सोनी, हैदर अली अशा अनेक दिग्गज फोटोग्राफरच्या कॅमेºयात कैद झालेली आणि त्यांची आवडती मॉडेल असलेली रोजलीन सध्या म्हणे नाराज आहे. गेल्या काही दिवसात ‘भाभी’ अशी रोजलीनची ओळख बनली आहे आणि त्यामुळेच ती नाराज आहे. मला भाभी म्हणणे बंद करा, असे ती तूर्तास सगळ्यांना सांगत फिरते आहे.



राम गोपाल वर्मा यांचा ‘सविता भाभी’  हा सिनेमा खरे तर रोजलीन करणार होती. याशिवाय नीरज वोरा यांच्या ‘आॅनलाईन भाभी’मध्येही तिला कास्ट केले जाणार होते. पण दुर्दैवाने हे दोन्ही चित्रपट मार्गी लागू शकले नाहीत. सध्या रोजलीन यामुळे दु:खी आहे. यासाठी ती आपल्या नशीबाला दोष देताना दिसतेय. हिंदी चित्रपटसृष्टीत माझे नशीब फार चांगले राहिले नाही. राम गोपाल वर्मा मला ‘ सविता भाभी’मधून लॉन्च करणार होते. पण काही कारणास्त हा प्रोजेक्ट रखडला. यानंतर नीरज वोरा यांनीही मला ‘आॅनलाईन भाभी’ या कॉमेडी चित्रपटाची आॅफर दिली होती. पण याचदरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला व ते कोमात गेलेत. (नीरज वोरा यांचे अलीकडे निधन झाले.) त्यामुळे हा चित्रपटही होता होता राहिला. त्यामुळे आता लोकांनी मला भाभी म्हणणे थांबवायला हवे, असे रोजलीन म्हणाली.
रोजलीन अनेक न्यूड व सेमी न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत असते. काही शॉर्ट्स फिल्म्स आणि वेब सीरिजही तिने केल्यात. ब्रेस्ट कॅन्सरप्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी तिने टॉपलेस फोटोशूटही केले होते.

Web Title: Razleen Khan annoyed with both films gone! Say, do not call me 'Sister-in-law' !!