‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 09:37 AM2017-10-01T09:37:43+5:302017-10-01T15:09:04+5:30

रविना टंडनने ‘बाहुबली’च्या टीमसोबत पार्टी का केली असावी? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही ही बातमी वाचायलाच हवी.

Ravi Tandon teamed with party with 'Bahubali' team overnight; What will the episode be? | ‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण?

‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण?

googlenewsNext
ाहुबली-२’ रिलीज होऊन कित्येक महिने झाले, परंतु चित्रपटाच्या आठवणी अजूनही कमी होत नाहीत. कारण हा चित्रपट कितीही वेळ बघा तुम्ही कधीही बोर होणार नाहीत. भल्लालदेव, माहेशम्ती, बाहुबली, देवसेना, कटाप्पा, शिवगामी हे पात्र अजूनही विसरले जात नाही, हेच वास्तव आहे. वास्तविक या चित्रपटानंतर सर्व कलाकार त्यांच्या-त्यांच्या कामात व्यस्त झाले आहेत. परंतु अजूनही हे स्टार एकत्र पार्टी करीत बाहुबलीचे सेलिब्रेशन करीत आहेत. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, फोटोमध्ये बाहुबलीच्या संपूर्ण टीमसोबत अभिनेत्री रविना टंडन दिसत आहे. 

हा फोटो हैदराबाद येथे घेण्यात आला आहे. एका कामानिमित्त रविना हैदराबादला गेली होती, ज्याठिकाणी तिची भेट ‘बाहुबली’च्या टीमसोबत झाली. ही भेट ऐवढ्या वेळ चालली की, यासर्व स्टार्सची रात्रभर पार्टी चालली. यावेळी रविनाने प्रभास, राणा दगुबत्ती, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टीची भेट घेतली. मात्र बाहुबलीच्या सर्व स्टार्सनी रविनानेच अधिक कौतुक केल्याचे समजते. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये प्रभास क्लीन सेव केलेला दिसत आहे. वास्तविक प्रभासने त्याच्या आगामी ‘साहो’साठी अशाप्रकारचा गेटअप केला आहे. ‘साहो’मध्ये प्रभासच्या अपोझिट बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर बघावयास मिळणार आहे. वृत्तानुसार श्रद्धाने प्रभाससोबत शूटिंग सुरू केली आहे. 
 

‘साहो’ या चित्रपटाची कथा स्वातंत्र्याअगोदरची आहे. चित्रपटात प्रभास इंग्रजांसोबत लढताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. घोडे, हत्ती, युद्धाचे मैदान, ब्रिटिश झेंडे अशा सर्व गोष्टी या क्लायमॅक्समध्ये बघावयास मिळतील. हा चित्रपट हिंदीसह इतर भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. हिंदीचे डबिंग स्वत: प्रभास करणार आहे. ज्याकरिता प्रभास सध्या हिंदीचे धडे घेत आहे. सूत्रानुसार श्रद्धा कपूर त्याला हिंदी शिकवित आहे. 

Web Title: Ravi Tandon teamed with party with 'Bahubali' team overnight; What will the episode be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.