​रवीना टंडनच्या ‘शब’चे पहिले गाणे आले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 15:13 IST2017-05-22T09:43:09+5:302017-05-22T15:13:09+5:30

बॉलिवूडमध्ये नव्याने अ‍ॅक्टिव्ह झालेली अभिनेत्री रवीना टंडनचा ‘मातृ’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. आता रवीनाचा आणखी एक चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘शब’. या चित्रपटाचे पहिले गाणे आज आऊट झाले.

Raveena Tandon's first song 'Shab' came ...! | ​रवीना टंडनच्या ‘शब’चे पहिले गाणे आले...!

​रवीना टंडनच्या ‘शब’चे पहिले गाणे आले...!

लिवूडमध्ये नव्याने अ‍ॅक्टिव्ह झालेली अभिनेत्री रवीना टंडनचा ‘मातृ’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. पण यातील रवीनाच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. समीक्षकांनी तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक केले. आता रवीनाचा आणखी एक चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘शब’. या चित्रपटाचे पहिले गाणे आज आऊट झाले. ‘ओ साथी’ असे या गाण्याचे बोल आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर तुम्ही बघितलेच. हे ट्रेलर सोशल मीडियावर लोकांना खूप आवडलेही. काही तासांपूर्वी या चित्रपटाचे गाणे रिलीज झाले. हे गाणे पाहिल्यानंतर ‘शब’ हा इमोशनल ड्रामा असलेला थ्रीलरपट असल्याचे आपल्या लक्षात येईल. रवीना या गाण्यात अतिशय हॉट दिसतेय. यात रवीना तिच्यापेक्षा वयाने बºयाच लहान हिरोसोबत रोमान्स करताना करतेय. अर्थात चित्रपटाच्या कथेचीच ती डिमांड होती. गाण्याबद्दल सांगायचे तर या गाण्याला संगीत दिलेय मिथुनने. अरिजीत सिंहने हे गाणे गायले आहे. 



‘शब’ची कथा दिल्लीतील एका घटनेवर आधारित आहे. यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जीची पत्नी अर्पिता बॉलिवूड डेब्यू करते आहे. चित्रपटात आशिष बिष्ट आहे. एका मॉडेलच्या भूमिकेत तो दिसणार आहे.



आशिष रवीना आणि अर्पिता या दोघींसोबत एका कॉम्पिकेटेड रिलेशनशिपमध्ये दिसणार आहे. येत्या ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचे गाणे तुम्ही ऐकायलाच हवे. शिवाय ते कसे वाटले, हेही आम्हाला कळवायला हवे. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता. 

Web Title: Raveena Tandon's first song 'Shab' came ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.