रवीना टंडनने नाकारले हे शाहरूख खानचे ४ चित्रपट, आजही होतोय तिला पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 09:31 AM2024-02-03T09:31:29+5:302024-02-03T09:32:50+5:30

नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या 'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

Raveena Tandon rejected Shah Rukh Khan's 4 films, she still regrets it | रवीना टंडनने नाकारले हे शाहरूख खानचे ४ चित्रपट, आजही होतोय तिला पश्चाताप

रवीना टंडनने नाकारले हे शाहरूख खानचे ४ चित्रपट, आजही होतोय तिला पश्चाताप

नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या 'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अलीकडेच या सीरिजचा पहिला सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.अशा परिस्थितीत, कर्मा कॉलिंगच्या प्रमोशन दरम्यान, रवीनाने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)बद्दल एक मोठे वक्तव्य केले. ती म्हणाली की ती त्याच्यासोबत हे ४ चित्रपट कसे करू शकले नाही.

शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील असा कलाकार आहे ज्याच्यासोबत मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. ९० च्या दशकात रवीना टंडन आणि शाहरुख खान दोघेही आपापल्या चित्रपट कारकिर्दीच्या यशाच्या शिखरावर होते. नुकतेच कर्मा कॉलिंग या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान रेडिओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने शाहरुखसोबत चार चित्रपटात काम करण्याची संधी कशी हुकली याबद्दल सांगितले.

....आणि चित्रपट रखडला
रवीना टंडन म्हणाली की, शाहरुख खान असा अभिनेता आहे ज्याच्यासोबत मला अनेक चित्रपट करण्याची संधी मिळाली नाही. पण एक काळ असा होता जेव्हा निर्मात्यांची त्यांच्या चार चित्रपटांसाठी मी पहिली पसंती होते. त्यात शाहरूखही होता. जेव्हा आम्ही दोघांनी एक चित्रपट साइन केला होता. मात्र काही काळानंतर चित्रपट दिग्दर्शकाचे निधन झाले आणि तो चित्रपट रखडला.

जुही चावला आधी रवीनाला मिळाली होती 'डर'ची ऑफर
ती पुढे म्हणाली की, यानंतर मला शाहरुखसोबत आणखी एका चित्रपटाची ऑफर मिळाली होती, ज्यातील पात्र आणि अभिनेत्रीचा लूक मला आवडला नाही आणि मी तो नाकारला. मला डर या चित्रपटाची ऑफर जुही चावलाच्या आधी मिळाली होती आणि एवढेच नाही तर आजही करण जोहर मला कुछ कुछ होता है चित्रपट न केल्याबद्दल टोमणा मारतो. ते सिनेमे मी करायला हवे होते, असे आजही मला वाटते.

या सिनेमात रवीना झळकली शाहरुखसोबत
मात्र, रवीना टंडनने शाहरुख खानसोबत कोणताही चित्रपट केलेला नाही असे नाही. १९९५ साली दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या जमाना-दीवाना या चित्रपटात शाहरुख आणि रवीनाची जोडी दिसली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

Web Title: Raveena Tandon rejected Shah Rukh Khan's 4 films, she still regrets it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.