Oops! अवार्ड शोमधील Rashmika Mandannaचा ड्रेस पाहून भडकले फॅन्स, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:00 IST2022-07-18T17:59:44+5:302022-07-18T18:00:32+5:30
Rashmika Mandanna : इव्हेंटमध्ये तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण पूर्णवेळ ती तिचा ड्रेस सावरताना दिसली. ड्रेस शॉर्ट असल्यामुळे तिला फोटोग्राफर्सला पोझ देणंही मुश्किल झालेलं पाहायला मिळालं.

Oops! अवार्ड शोमधील Rashmika Mandannaचा ड्रेस पाहून भडकले फॅन्स, म्हणाले...
‘पुष्पा- द राइज’नंतर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) चाहत्यांची सर्वाधिक आवडती हिरोईन बनली आहे. तमात चाहते रश्मिकावर अक्षरश: फिदा आहेत. रश्मिका साऊथची मोठी सुपरस्टार आहेच. पण ‘पुष्पा’ ब्लॉकबस्टर झाल्यानंतर हिंदी सिनेमांचे चाहतेही रश्मिकाच्या प्रेमात वेडे झाले आहेत. रश्मिका तिच्या दमदार अॅक्टिंगसोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. अलीकडे रश्मिका एका अवार्ड शोमध्ये पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा जणू तिच्यावरच खिळल्या. रेड कलरच्या या ब्लॅकलेस थाई हाय स्लिट गाऊनमध्ये रश्मिका कमालीची सुंदर दिसत होती. पण सोबत तितकीच अन्कम्फर्टेबल देखील. तिचा या अवार्ड शोमधला व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग काय, तो पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
व्हिडीओत रश्मिका उप्स मोमेंटची शिकार होता होता वाचली. इव्हेंटमध्ये तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण पूर्णवेळ ती तिचा ड्रेस सावरताना दिसली. ड्रेस शॉर्ट असल्यामुळे तिला फोटोग्राफर्सला पोझ देणंही मुश्किल झालेलं पाहायला मिळालं. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते रिअॅक्ट झाले नसतील तर नवल. अनेकांनी तिला ड्रेसवरून सुनावलं.
ड्रेस इतका अन्कम्फर्टेबल आहे. असे ड्रेस घालतातच का? असा सवाल रश्मिकाचा हा व्हिडीओ पाहून एका चाहत्याने केला. आपल्या देसी स्टार्सला हे समजायला हवं की ते जेनिफर लोपेज वा गीजी हदीदसारखे नाही दिसू शकतं, अशी कमेंट एका चाहत्याने केला. छी..छी... काय ड्रेस आहे. काही तर लाज बाळगा, अशा शब्दांत एका युजरने रश्मिकाला ट्रोल केलं.
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मध्ये दिसणार आहे. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटात ती झळकणार आहे.