आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:06 IST2025-05-19T16:05:53+5:302025-05-19T16:06:13+5:30

राशा थडानी आई रवीना टंडनच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकली आणि उपस्थित प्रेक्षकांना ९० च्या दशकाची आठवण करून दिली.

Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani Viral Video Raveena Daughter | आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani:  ९०च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याला आजही लोकांच्या हृदयात खास स्थान आहे. रवीना टंडन आणि अक्षय कुमारच्या 'मोहरा' चित्रपटातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. याच गाण्यावर आता रवीनाची लेक राशा थडानीने  (Rasha Thadani) थिरकून प्रेक्षकांची मनं जिंकली. राशानं आपल्या आईच्या जुन्या हिट गाण्याला नव्या जोमात सादर केलं आणि आपल्या उत्साही नृत्याने स्टेजवर रंगत आणली. तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

एका आवार्ड सोहळ्यात राशानं 'टिप टिप बरसा पानी'वर डान्स केला. यावेळी राशानं पिवळ्या रंगाची हाय स्लिट साडी परिधान परिधान केली होती. तर सोनेरी क्रोशे ब्लाउजसह ग्लॅमरस लुकमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत होती. उंच पोनीटेलमधील तिची स्टाईल आणि एक्स्प्रेशन्सनं प्रेक्षकांची मने जिंकली.  उपस्थित प्रेक्षकांना राशानं ९० च्या दशकाची आठवण करून दिली.


राशाच्या डान्स परफॉर्मन्सचं सगळीकडे कौतुक सुरू आहे.  एका युझरनं लिहलं, "क्षणभर वाटलं ती रवीना टंडनच आहे". याशिवाय काही लोकांनी राशा थडानीची तुलना इतर स्टार किड्सशी केली. एका युझरनं लिहलं, "ती एक प्रतिभावान स्टार किड आहे". तर दुसऱ्याने कमेंट केली की, "ती इतर स्टार किड्सपेक्षा खूपच चांगली आहे". तर फक्त रवीनाच्या गाण्यावर नाही तर राशाने माधुरी दीक्षितच्या 'एक दो तीन' या गाण्यावरही जोरदार परफॉर्मन्स सादर केला. लाल लेहंगा आणि सोनेरी टॉपमध्ये तिची एनर्जी आणि डान्स मूव्ह्स पाहून प्रेक्षक भारावून गेले.


दरम्यान, राशा थडानीने यावर्षीच 'आझाद' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमात ती अजय देवगण आणि त्यांचा पुतण्या आमन देवगण यांच्यासोबत दिसली. तिचं 'ओये अम्मा' हे गाणं विशेष गाजलं असून, त्यामधील तिच्या नृत्यकौशल्याचं मोठं कौतुक झालं आहे. अभिनेत्री म्हणून ती आता फक्त स्टार किड म्हणूनच नव्हे, तर एक स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.

Web Title: Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani Viral Video Raveena Daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.