Rapper Badshah Birthday : बादशाहची अधुरी प्रेमकहाणी...! एकेकाळी गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडापीसा झाला होता डीजेवाले बाबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:40 IST2022-11-19T12:40:32+5:302022-11-19T12:40:56+5:30

Rapper Badshah Birthday : प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार बादशाह आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Rapper Badshah Birthday : Badshah's incomplete love story...! DJ Wale Babu was once madly in love with his girlfriend | Rapper Badshah Birthday : बादशाहची अधुरी प्रेमकहाणी...! एकेकाळी गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडापीसा झाला होता डीजेवाले बाबू

Rapper Badshah Birthday : बादशाहची अधुरी प्रेमकहाणी...! एकेकाळी गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडापीसा झाला होता डीजेवाले बाबू

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार बादशाह (Rapper Badshah) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. गायन कौशल्याच्या जोरावर बादशाहने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो अनेकदा मीडियाच्या चर्चेत असतो. बादशाह उर्फ ​​आदित्य प्रतीक सिंह सिसोदियाचा जन्म १९ नोव्हेंबर १९८५ रोजी दिल्लीत झाला. तो दिल्लीतच लहानाचा मोठा झाला. रिपोर्ट्सनुसार, बादशाहने यो यो हनी सिंगसोबत त्याच्या सिंगिंग करिअरची सुरुवात केली होती. मात्र, नंतर दोघे वेगळे झाले आणि बादशहाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या गायनासोबतच बादशाह त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतो. एकदा त्याने त्याच्या मैत्रिणीशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला होता.

एकदा मीडियाशी संवाद साधताना बादशाहने त्याच्या पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला. याशिवाय त्याने आपली अपूर्ण प्रेमकहाणीही उघड केली. पाचवी इयत्तेत शिकत असताना पहिल्यांदा प्रेमात पडल्याचं त्याने सांगितलं होतं. तथापि, ते गंभीर प्रेम नव्हते. यानंतर त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली. बादशाहच्या म्हणण्यानुसार, तो त्या मुलीच्या प्रेमात वेडापीसा झाला होता, पण या प्रेमकहाणीमध्ये बादशाहचे करिअर आले. बादशाह म्हणाला होता की तो त्याच्या मैत्रिणीसोबत चांगले जमत होते आणि दोघेही त्यांच्या भावी आयुष्यासाठी योजना आखत होते, परंतु मुलीला त्याचे गाणे आवडले नाही. यानंतर दोघेही वेगळे झाले.


बादशाहने २००६ साली हनी सिंगसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्याच्या हिप हॉप ग्रुपमध्ये सामील झाला. २०१२ मध्ये दोघे वेगळे झाले. यानंतर बादशाहने 'कर गई चुल' हे हरियाणवी गाणे रिलीज केले. नंतर हे गाणे 'कपूर अँड सन्स' चित्रपटात वापरले गेले. २०१५ मध्ये बादशाह पंजाबी हिप हॉप सिंगल 'डीजे वाले बाबू' घेऊन आला. हे गाणे प्रचंड गाजले. २०१८ मध्ये, बादशाहने त्याचा पहिला अल्बम 'ओरिजिनल नेव्हर एंड्स' (O.N.E.) रिलीज केला. बादशाहने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडला काही सर्वोत्तम पार्टी गाणी दिली आहेत.

बादशाह हा वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. २०१२ मध्ये बादशाहनं जॅस्मिनसोबत लग्नगाठ बांधली. २०१७ मध्ये जॅस्मिन आणि बादशाह आई-वडील झाले. त्यांना एक मुलगी झाली. मुलीचं नाव त्यांनी जेसी ग्रेस असं ठेवलं आहे. रिपोर्टनुसार, लॉकडाऊन दरम्यान जॅस्मिन आणि बादशाह यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर जॅस्मिन तिच्या मुलीला घेऊन लंडनला गेली. बादशाह आणि जॅस्मिन दोघे विभक्त झाले, असे बोलले जाते. सध्या बादशाहचे नाव अभिनेत्री ईशा रिखीसोबत जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असे म्हटले जात आहे. पण बादशाहने ईशा रिखीसोबतच्या नात्याबाबात अजून कोणताही खुलासा केलेला नाही.

Web Title: Rapper Badshah Birthday : Badshah's incomplete love story...! DJ Wale Babu was once madly in love with his girlfriend

टॅग्स :Badshahबादशहा