रॅपर बादशहा म्हणतो, मी बॉलिवूडचा ‘clean-up guy’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 12:29 IST2018-08-13T12:29:04+5:302018-08-13T12:29:28+5:30

'डीजे वाले बाबू मेरा गाना बजादे' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला रॅपर बादशहाचे नाव आज कुणाला ठाऊक नाही. फार कमी वेळात बादशहाने बॉलिवूडमध्ये आपले स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले

Rappar Badshah says, 'I am a clean-up guy' | रॅपर बादशहा म्हणतो, मी बॉलिवूडचा ‘clean-up guy’

रॅपर बादशहा म्हणतो, मी बॉलिवूडचा ‘clean-up guy’

'डीजे वाले बाबू मेरा गाना बजादे' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला रॅपर बादशहाचे नाव आज कुणाला ठाऊक नाही. फार कमी वेळात बादशहाने बॉलिवूडमध्ये आपले स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण हे स्थान निर्माण करताना मात्र बादशहाला बऱ्याच बोच-या अनुभवांना सामोरे जावे लागले. मी बॉलिवूडसाठी ‘क्लिन अप सिंगर’ आहे, असे बादशहा अलीकडे एका मुलाखतीत बोलून गेला. त्याचे हे शब्द बरेच काही सांगणारे आहेत.
‘नमस्ते इंग्लड’ आणि ‘स्त्री’ या आगामी चित्रपटात बादशहाच्या आवाजातील गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बादशहाने अलीकडे मिड डेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली. बॉलिवूडला अगदी अखेरच्या क्षणाला माझी आठवण होते. चित्रपट रिलीजसाठी तयार आहे, अशावेळी बॉलिवूडचे अनेकजण माझ्याकडे येतात. बॉस एक गाना दे दो, असे म्हणत आर्जव करतात. अशा ऐनवेळी मी त्यांना काय पर्याय देणार. माझ्याकडे हे गाणे आहे. आवडले तर बघा, असे मी त्यांना म्हणतो. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये माझ्यासोबत हेच झाले आहे. मी बॉलिवूडचा ‘clean-up guy’ ठरलो आहे, असे बादशहा म्हणाला.

 

 

 

 

Web Title: Rappar Badshah says, 'I am a clean-up guy'

टॅग्स :Badshahबादशहा