म्हणून एकत्र आले रणवीर कॅटरिना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:16 IST2017-02-04T10:46:59+5:302017-02-04T16:16:59+5:30
बॉलिवूडमध्ये चर्चित कपल्सपैकी एक मनाले जाणारे रनबीर क पूर व कॅटरिना कैफ आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात एकत्र दिसणार ...

म्हणून एकत्र आले रणवीर कॅटरिना!
ब लिवूडमध्ये चर्चित कपल्सपैकी एक मनाले जाणारे रनबीर क पूर व कॅटरिना कैफ आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रनबीर व कॅटरिना यांना ब्रेकअपनंतर एकत्र बराच वेळ घालविला व चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबत बरीच मजामस्ती केली. मात्र शूटिंग दरम्यान थोडा दुरावा ठेऊन असणाºया रनबीर व कॅटरिना एका कारणासाठी एकत्र आले होते.
जग्गा जासूस या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. यात रनबीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांच्या मुख्य भूमिका असून या चित्रपटातील काही दृष्ये नुकतीच शूट करण्यात आली. यादरम्यान दोघांनी चांगलीच मस्ती केल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीने सेटवरील एक कि स्सा सांगितला. चित्रीकरणादरम्यान अनुराग बासूने त्याच्या टीमसोबत प्रँक केले. काही असिस्टंटचे केस कापले. याचा बदला घेण्यासाठी त्याच्या असिस्टंटनी रणबीर कपूरची मदत घेतली. रणबीरनेही एका क्षणात लगेच यासाठी होकार दिला. त्याने सोबतीला कतरिनाला घेऊन अनुरागला एका खुर्चीवर बसवले आणि असिस्टंट्सचा बदला घेण्यासाठी त्याचे केस कापण्यास सुरुवात केली. रणबीर भलेही रुपेरी पडद्यावर एक उत्तम कलाकार असेल. पण, तो काही उत्तम हेअर स्टाइलिस्ट नाही. यामुळे अनुरागचे केसही असे विचित्र झाले की अनुरागला त्याचे केस वाढण्याची वाट पाहण्याव्यतिरीक्त पर्याय उरलेला नाही.
![]()
‘जग्गा जासूस’ चित्रपटात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ब्रेकअपनंतर पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील. या दोघांचा हा एकत्र तिसरा चित्रपट असेल. याआधी त्यांनी ‘राजनीती’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाव्यतिरीक्त रणबीर कपूर लवकरच संजय दत्तच्या बायोग्राफीमध्ये दिसणार आहे.