​वरुण घेणार रणवीरची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 20:30 IST2016-11-30T20:30:58+5:302016-11-30T20:30:58+5:30

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग सध्या आदित्य चोपडा यांच्या बेफिक्रे व संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करीत असलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटांमुळे ...

Ranveer's place to take Varun | ​वरुण घेणार रणवीरची जागा

​वरुण घेणार रणवीरची जागा

ong>बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग सध्या आदित्य चोपडा यांच्या बेफिक्रे व संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करीत असलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. याच दरम्यान तो जोया अख्तरच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात भूमिका करणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र आता त्याच्या जागी वरुण धवन ही भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पद्मावतीचे शूटिंग सुरू होण्याआधी रणवीरने जोया अख्तरच्या आगामी चित्रपटास होकार कळविला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लकवरच या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. जोया अख्तरच्या या चित्रपटाचे नाव ‘गली बॉय’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटामधून झोपडपट्टीत राहणारा एक तरुण प्रसिद्ध रॅपर बनतो हे दाखविण्यात येणार आहे. यात रणवीर प्रमुख भूमिका साकारणार होता. मात्र त्याने आता यासाठी नकार कळविला असल्याचे सांगण्यात येते. 

‘पद्मावती’मध्ये बिझी असल्याने व त्यासाठी लागणार आवश्यक लूक ठेवल्याने जोयाच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग त्याला शक्य होणार नसल्याचे त्याने कळविले आहे. त्याच्या जागी अभिनेता वरुण धवनला विचारणा करण्यात आली आहे. वरुण धवनने नुकतीच ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. जोया व वरुण यांनी या चित्रपटासंदर्भांत चर्चा केली असून, वरुणला या चित्रपटाची कथा आवडली आहे. 

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुणच्या शेड्यूलनुसार या चित्रपटाच्या शूटिंगचा प्लॅन आखण्यात येणार आहे. सामान्यत: पुढील वर्षी या चित्रपटाची शूटिंग सुरू केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कोण असेल हे मात्र अद्याप निश्चित झाले नाही. 
जोया अख्तराचा गली बॉय हा चित्रपट धारावीतील सुप्रसिद्ध बँड ‘स्लमगॉड्स’पासून प्रेरित आहे. 

Web Title: Ranveer's place to take Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.