Don 3 ची उत्सुकता, रणवीर सिंगने केलं शाहरुखला रिप्लेस? अनाऊंसमेंट व्हिडिओ रिलीज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:53 AM2023-05-19T11:53:01+5:302023-05-19T12:23:40+5:30

शाहरुख खान 'डॉन'च्या भूमिकेत दिसणार नाही समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे.

ranveer singh to replace shahrukh khan in Don 3 announcement video to release soon | Don 3 ची उत्सुकता, रणवीर सिंगने केलं शाहरुखला रिप्लेस? अनाऊंसमेंट व्हिडिओ रिलीज होणार

Don 3 ची उत्सुकता, रणवीर सिंगने केलं शाहरुखला रिप्लेस? अनाऊंसमेंट व्हिडिओ रिलीज होणार

googlenewsNext

Don 3 : 'डॉन' फ्रँचायझीचा तिसरा सिनेमा 'डॉन 3' ची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी निर्माता रितेश सिधवानीने 'डॉन ३' च्या स्क्रीप्टवर काम सुरु असल्याचा खुलासा केला. तर दुसरीकडे शाहरुख खानने (Shahrukh Khan) 'डॉन' सिरीज मधून बाहेर पडला. आता शाहरुखच्या जागी कोणाला घ्यायचे याचा शोध सुरु असतानाच नवीन माहिती समोर आली आहे.  अभिनेता रणवीर सिंह (Ranveer singh) शाहरुखला रिप्लेस करेल अशी चर्चा आहे.

दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या 'डॉन ३' च्या स्क्रीप्टवर काम करत  आहे. स्क्रीप्ट शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान शाहरुख खान 'डॉन'च्या भूमिकेत दिसणार नाही समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. कमर्शियल चित्रपट करायचा नसल्याचे कारण सांगत तो 'डॉन'मधून बाहेर पडला आहे.

रणवीर सिंह साकारणार 'डॉन' 

माध्यम रिपोर्टनुसार, मेकर्सने 'डॉन 3'साठी अभिनेता रणवीर सिंहला फायनल केल्याची चर्चा आहे. मात्र यासंबंधी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.  शाहरुख बाहेर पडल्यानंतर मेकर्स लोकप्रिय आणि विश्वसनीय कास्टिंगच्या शोधात होते जो 'डॉन'ची भूमिका पेलवू शकेल. शेवटी रणवीर सिंहच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. 

लवकरच येणार अनाऊंसमेंट व्हिडिओ 

डॉन 3 संदर्भात आणखी महत्वाची अपडेट म्हणजे रणवीर सिंहचा एक प्रोमो व्हिडिओ शूट करुन झाला आहे. येत्या काही दिवसात हा व्हिडिओ रिलीज करत 'डॉन 3'ची घोषणा होऊ शकते. सिनेप्रेमी 'डॉन 3' साठी खूपच आतुर आहेत.

Web Title: ranveer singh to replace shahrukh khan in Don 3 announcement video to release soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.