‘गहराइयां’च्या ट्रेलरमधील दीपिकाचे बोल्ड सीन्स पाहून रणवीर अवाक्; म्हणाला, मेरी बेबी.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:44 IST2022-01-21T15:43:48+5:302022-01-21T15:44:29+5:30
Gehraiyaan Trailer: ‘गहराइयां’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. अगदी दीपिकाचा पती रणवीर सिंग हाही ट्रेलर पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही...

‘गहराइयां’च्या ट्रेलरमधील दीपिकाचे बोल्ड सीन्स पाहून रणवीर अवाक्; म्हणाला, मेरी बेबी.....
दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Panday), धैर्य करवा स्टारर ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. या आगामी सिनेमात दीपिकाने सिद्धांतसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. ट्रेलरमध्येही त्याची झलक दिसते. तूर्तास त्याचीच चर्चा आहे. अगदी दीपिकाचा पती रणवीर सिंग (Ranveer Singh) हाही ट्रेलर पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही.
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रणवीरने चित्रपटातील दीपिकाचं पोस्टर शेअर केलं.
‘मूडी, सेक्सी आणि इंटेन्स...डोमेस्टिक नोअर? मला पण साईन करून घे..,’अशी पोस्ट रणवीरने केली आहे. ‘आणि माझी बेबी गर्ल Fazillion buxxx सारखी दिसतेय...,’ असं दीपिकाला टॅग करून रणवीरने लिहिलं आहे.
दीपिकाच्या ‘गहराइयां’च्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. 20 तासात हा ट्रेलर 10 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.
‘गहराइयां’ हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘मुझे घर में रहना पसंद नहीं है, मैं यहां खुद फंसी महसूस करती हूं,’असं दीपिका म्हणते. यानंतर चुलत बहिणीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झालेली दीपिका दिसते. ट्रेलरमध्ये दीपिका, अनन्या व सिद्धांतचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळतो. दीपिका व सिद्धार्थचे अनेक बोल्ड लव्ह मेकिंग सीन्स ट्रेलरमध्ये आहेत.
दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुवेर्दी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिद्धांतने याआधी दीपिकाचा पती आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सिद्धांतने रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’ या चित्रपटात काम केलं होतं. आता सिद्धांत दीपिका सोबत दिसणार असल्याने हा चित्रपट त्याच्यासाठी आणखी खास ठरणार आहे.