Ranveer Singh Photoshoot: 'मी 1 हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो, पण...', त्या फोटोशूटवर रणवीर स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:47 PM2022-07-22T15:47:48+5:302022-07-22T15:48:19+5:30

Ranveer Singh Photoshoot: एका मॅगझीनसाठी रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले आहे. काही फोटोमध्ये तर तो पूर्णपणे नग्न दिसतोय.

Ranveer Singh Photoshoot: 'I can get naked in front of 1000 people, but...', Ranveer spoke on that photoshoot | Ranveer Singh Photoshoot: 'मी 1 हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो, पण...', त्या फोटोशूटवर रणवीर स्पष्टच बोलला

Ranveer Singh Photoshoot: 'मी 1 हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो, पण...', त्या फोटोशूटवर रणवीर स्पष्टच बोलला

googlenewsNext

Ranveer Singh Photoshoot:रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर नेहमीच त्याच्या आगळ्या-वेगळ्या फॅशनसेन्समुळे चर्चेत असतो. पण, सध्या रणवीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ऐरवी रणवीर त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत असतो, पण आता तो कपडे न घालण्यावरुन चर्चेत आला आहे. 

'मी 1000 लोकांसमोर नग्न होऊ शकतो'
रणवीरला अनेकदा ड्रेसिंग स्टाइलवरुन ट्रोल व्हावं लागतं, पण त्याला याचा काही फरक पडत नाही. तो नेहमी याकडे दुर्लक्ष करतो. पण, आता त्याने केलेल्या न्यूड फोटोशूटवरुन चाहत्यांनाही जबरदस्त धक्का बसला आहे. त्याला यामुळे जबरदस्त ट्रोल केले जात आहे. याबाबत मॅगझीनशी संवाद साधताना रणवीरने अतिशय स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.

काय म्हणाला रणवीर?
तो म्हणतो की, 'शारीरिकदृष्ट्या न्यूड राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. माझ्या काही परफॉर्मन्समध्येही मी न्यूड झालोय. त्यात तुम्ही माझा आत्मा पाहू शकता. यापेक्षा मोठी नग्नता काय असू शकते? यालाच तर नग्न होणे म्हणतात. मी हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो. मला काही फरक पडत नाही, पण पाहणारे लोक अस्वस्थ होतील.'

रणवीर 20 तास काम करतो
यावेळी रणवीरने त्याच्या कामाबद्दल असलेली अपेक्षा बोलून दाखवली. तो म्हणाला की, 'मला सतत काम करण्याची, परफॉर्म करण्याची, चाहत्यांना काहीतरी नवीन देण्याची भूक आहे. मी दिवसाचे 20-20 तास काम करतो, त्याल मला आनंद वाटतो. आयुष्यात मुक्तपणे जगणे मला आवडते.

रणवीरचे आगामी चित्रपट
रणवीर सिंग शेवटचा 'जयेशभाई जोरदार' चित्रपटात दिसला होता. सध्या तो करण जोहरच्या 'रॉकी और रानी की कहानी' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. याशिवाय रणवीर सिंह रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटातही दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
 

Web Title: Ranveer Singh Photoshoot: 'I can get naked in front of 1000 people, but...', Ranveer spoke on that photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.