रणवीर सिंहला कपड्यांमुळे अटक होणार; शाहरुख खानने आधीच केली होती भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:11 PM2022-07-29T14:11:31+5:302022-07-29T14:12:22+5:30

अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Ranveer Singh Nude PhotoShoot: Ranveer Singh to be arrested for clothes; Shah Rukh Khan had already made the prediction | रणवीर सिंहला कपड्यांमुळे अटक होणार; शाहरुख खानने आधीच केली होती भविष्यवाणी

रणवीर सिंहला कपड्यांमुळे अटक होणार; शाहरुख खानने आधीच केली होती भविष्यवाणी

googlenewsNext

Ranveer Singh Nude PhotoShoot: अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अमेरिकन मासिक 'पेपर'साठी केलेल्या या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुंबईत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत काही वर्षांपूर्वीच अभिनेता शाहरुख खानने(Shah Rukh Khan) भविष्यवाणी केली होती.

रणवीरबद्दल शाहरुखचा अचूक अंदाज
चित्रपट निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण' सीझन 7 सुरू झाला आहे. पण, 2017 मध्ये शाहरुख खान आणि आलिया भट्ट 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये आले होते. यादरम्यान शाहरुखने रणवीरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला होता की कपड्यांमुळे एक दिवस त्याला अटक केली जाईल. शाहरुख खान 'कॉफी विथ करण'च्या सीझन 5 च्या एका एपिसोडमध्ये शाहरुखला विचारले होते की, 'रणवीर सिंगला अटक झाल्याचे कधी ऐकले तर,' त्यावर शाहरुख म्हणाला की, 'रणवीरला कपडे घातले म्हणून किंवा कपडे काढले म्हणून' अटक होईल. शाहरुख तेव्हा गमतीने असं म्हटला होता. पण, आता ते खचं ठरत आहे.

रणवीर सिंगचे वादग्रस्त फोटोशूट
उत्कृष्ट अभिनय, खास फॅशन स्टाइल आणि जबरदस्त एनर्जीमुळे चर्चेत असलेला रणवीर सिंग नुकत्याच केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे वादात सापडला आहे. रणवीरच्या या बोल्ड फोटोशूटचे अनेकांनी समर्थन केले असले तरी अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे. रणवीर सिंगच्या विरोधात मध्य प्रदेशातही आंदोलन झाले होते. मध्य प्रदेशातील काही लोकांनी रणवीरचा न्यूड फोटोशूटचा फोटो लावून कपडे दान केले. 

Web Title: Ranveer Singh Nude PhotoShoot: Ranveer Singh to be arrested for clothes; Shah Rukh Khan had already made the prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.