लक्षद्वीप समजून रणवीरने मालदीवचाच फोटो केला ट्वीट, नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर केले डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:58 AM2024-01-09T09:58:08+5:302024-01-09T09:58:42+5:30
रणवीर सिंह झाला ट्रोल
Lakshadweep vs Maldives: लक्षद्वीप विरुद्ध मालदीव वादात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेही (Ranveer Singh) उडी मारली आहे. लक्षद्वीपला पाठिंबा देत त्याने ट्वीट केले. मात्र यामध्ये त्याने एक मोठी चूक केली जी हुशार नेटकऱ्यांनी लगेच पकडली. रणवीरने लक्षद्वीप समजून मालदीवचाच फोटो ट्वीट केला. यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. चूक लक्षात आल्यानंतर रणवीरने फोटो डिलीट केला आहे. मात्र तोवर त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.
मालदीव मंत्र्यांनी भारताविरोधात केलेल्या अपमानजनक टीकेनंतर भारतात मालदीवविरोधात लाट उठली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप येथे सुट्ट्यांचा आनंद घेत काही सुंदर फोटो पोस्ट केले. यानंतर भारतातील सर्वच दिग्गजांपासून ते सामान्य लोकांनी लक्षद्वीप पर्यटनाला प्रोत्साहन देत मालदीवविरोधात आवाज उठवला. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, जान्हवी कपूर अशा अनेक सेलिब्रिटींनी लक्षद्वीपच्या सौंदर्याची स्तुती केली. काल रणवीर सिंहनेही फोटो पोस्ट करत लिहिले, 'यावर्षी 2024 मध्ये चला भारतभ्रमंती करुया आणि आपल्या देशाच्या संस्कृतीचा अनुभव घेऊया. आपल्या देशाचं सौंदर्य आणि सागरी किनाऱ्यांवर बरंच काही पाहण्यासारखं आहे.' या ट्वीटसोबत रणवीरने फोटो पोस्ट केले.
Ranveer Singh was using Maldives pic to promote Lakshadweep.
— Sachin Sagar (✷‿✷) (@sachin_31sagar) January 8, 2024
He has now deleted the post.
Moye Moye 😂😂 https://t.co/Nn7rDKQxj2pic.twitter.com/uNffJ9j1AF
हे फोटो पाहून नेटकरी म्हणाले,'रणवीर जे सौंदर्य दाखवत आहे ते मालदीवचं आहे'. हे समजल्यानंतर रणवीरला ट्रोल करायला सुरुवात झाली. आपली चूक लक्षात येताच रणवीरने पोस्ट तशीच ठेवत फोटो मात्र डिलीट केले. अशा प्रकारे रणवीरचा 'मोए मोए' मोमेंट झाल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आणि त्याची खिल्ली उडवली.