Ranveer Singh : रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:45 AM2022-12-13T10:45:40+5:302022-12-13T10:47:34+5:30

बॉलिवुडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या वेगळेपणामुळे कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा रणवीर सिंगने त्याच्या एका कृतीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. 

ranveer-singh-lifts-up-a-child-to-protect-him-from-crowd-netizens-praises-his-behaviour | Ranveer Singh : रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून...

Ranveer Singh : रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून...

googlenewsNext

Ranveer Singh : बॉलिवुडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या वेगळेपणामुळे कायम चर्चेत असतो. त्याची ड्रेसिंग स्टाईल असो किंवा त्याच्या एनर्जीमुळे प्रत्येक जण त्याच्या प्रेमात असतो. आता पुन्हा एकदा रणवीर सिंगने त्याच्या एका कृतीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. 

सध्या रणवीर सिंग आगामी सिनेमा सर्कसचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित सर्कस (Circus Movie) मध्ये अनेक कलाकारांची भुमिका असून फुल पॅक एंटरटेनमेंटने भरलेला हा सिनेमा असणार आहे. मुंबईतील मालाडमध्ये एका कार्यक्रमात सर्कसची टीम प्रमोशनसाठी आली होती. कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. मालाड मस्ती असा तो इव्हेंट होता. एक छोटा मुलगा रणवीर सिंगच्या मागे  पळत होता. खूप गर्दी असल्याने तो ढकलला जात होता. हे जेव्हा रणवीरने पाहिले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट त्या मुलाला कडेवर घेतले. मुलाला कडेवर घेऊनच तो खाली आला आणि त्याला गर्दीतुन वाचवले. 

रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रत्येक जण त्याचे कौतुक करताना दिसत आहे. लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती प्रत्येकालाच रणवीर आपलंसं करतो. म्हणूनच त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. 

रोहीत शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये पुजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर यांचीही भुमिका आहे. तर दीपिका पदुकोणचा यात कॅमिओ असणार आहे.

Web Title: ranveer-singh-lifts-up-a-child-to-protect-him-from-crowd-netizens-praises-his-behaviour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.