रणवीर सिंगने 'या' व्यक्तीला केले खुलेआम किस, फोटो झाले वाऱ्यासारखे व्हायरल, तुम्हीही पहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 17:40 IST2017-11-04T12:09:20+5:302017-11-04T17:40:33+5:30
रणवीर सिंग त्याच्या विचित्र कारनाम्यांसाठी ओळखला जातो, यावेळेसदेखील त्याने असाच काहीसा कारनामा केला आहे. वाचा सविस्तर!

रणवीर सिंगने 'या' व्यक्तीला केले खुलेआम किस, फोटो झाले वाऱ्यासारखे व्हायरल, तुम्हीही पहा!
ब लिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच आगामी ‘पद्मावती’मध्ये एका भयंकर खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात तो अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. जेव्हा चित्रपटातील त्याचा या भूमिकेचा पहिला लूक रिलीज करण्यात आला तेव्हापासून तो तुफान पसंत केला जात आहे. आता त्याचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. असो, रणवीरने नुकताच केलेला त्याचा एक कारनामा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक रणवीर चालता-बोलता काही ना काही कारनामा करीत असतो. मात्र यावेळेस तो एका स्पेशल कारणामुळे चर्चेत आला आहे. होय, रणवीरने यावेळेस खुलेआम किस केले आहे. आता तुम्ही म्हणाल की, त्याने दीपिका किंवा बॉलिवूडमधील इतर एखाद्या सुंदर अभिनेत्रीला किस केले असेल? परंतु त्याने ज्या व्यक्तीला किस केले ते वाचून तुम्ही चकित व्हाल.
![]()
त्याचे झाले असे की, रणवीर जीम वर्कआउट करून परतत होता. मात्र नेहमीप्रमाणे यावेळेसदेखील त्याचे चाहते जीमच्या बाहेर त्याची प्रतीक्षा करीत होते. बाहेर आल्यानंतर रणवीरने त्याच्या चाहत्यांना हात दाखविला तोच त्यातील काही तरुण त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्याच्या दिशेने धावले. मात्र रणवीर काहीसा घाईमध्ये असल्याने त्याला तेथून लवकर निघायचे होते. ही बाब जेव्हा तेथील एका कॉन्स्टेबलच्या लक्षात आली तेव्हा ते लगेचच रणवीरकडे आले. त्यांनी गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र रणवीरला त्या कॉन्स्टेबलचे काम एवढे प्रभावित करून गेले की, त्याने त्यांच्या गालावर सर्वांसमक्ष किस केले. हा किस्सा त्याच्या बºयाचशा चाहत्यांनी कॅमेºयात कैद केला. त्यामुळे रणवीरचा हा किस सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. शिवाय याबाबतचा एक व्हिडीओदेखील यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.
![]()
रणवीरला त्याच्यातील जोश आणि एनर्जीसाठी इंडस्ट्रीत ओळखले जाते. शिवाय तो अशाप्रकारचे कारनामे करण्यातही माहीर आहे. असो, रणवीर आगामी ‘पद्मावती’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाला विरोध होत असल्याने, चित्रपट कधी रिलीज केला जाईल हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.