दीपिकापेक्षाही सुंदर पण प्रसिद्धीपासून दूर! रणवीर सिंग मोठ्या बहिणीला मानतो आपली 'दुसरी आई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:59 IST2025-12-28T15:50:00+5:302025-12-28T15:59:32+5:30
रणवीर सिंगच्या मोठ्या बहिणीबद्दल तुम्हाला माहितीये का? दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर

दीपिकापेक्षाही सुंदर पण प्रसिद्धीपासून दूर! रणवीर सिंग मोठ्या बहिणीला मानतो आपली 'दुसरी आई'
Ranveer Singh Elder Sister Ritika Bhavnani : बॉलिवूडचा 'पॉवरहाऊस' अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीरच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्याच्या खासगी आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती नेहमीच कॅमेऱ्याच्या झगमगाटापासून दूर राहते. ती म्हणजे रणवीरची मोठी बहीण रितिका भावनानी. रितिका दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे, मात्र तिला साधेपणा आणि खाजगी आयुष्य जास्त प्रिय आहे.
रणवीर सिंगने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या बहिणीबद्दल भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. रितिका ही केवळ त्याची मोठी बहीण नाही, तर ती त्याची 'छोटी आई' असल्याचे तो मानतो. रणवीर जेव्हा अमेरिकेत शिक्षणासाठी होता, तेव्हा रितिका न चुकता त्याला रक्षाबंधनासाठी तांदळाचे छोटे पॅकेट आणि पैसे पाठवत असे. आजही या दोघांमधील बॉण्डिंग तितकेच घट्ट आहे.
रणवीरच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रिया म्हणजेच त्याची बहीण रितिका आणि पत्नी दीपिका पादुकोण यांच्यातही खूप प्रेम आहे. विशेष म्हणजे, रणवीरशी लग्न होण्यापूर्वीपासूनच रितिकाची आवडती अभिनेत्री दीपिका पादुकोण होती. वहिनी म्हणून दीपिकाचे आगमन झाल्यानंतर रितिकाने तिचे कुटुंबात मोठ्या आनंदाने स्वागत केले. नुकतेच दीपिका आणि रणवीरला कन्यारत्न प्राप्त झाले, तेव्हाही रितिका सर्वात आधी हॉस्पिटलमध्ये बाळाला भेटायला पोहोचली होती.
प्राणीप्रेमी आणि मीडियापासून राहते दूर
५ ऑगस्ट १९८३ रोजी मुंबईत जन्मलेली रितिका ही प्रचंड प्राणीप्रेमी आहे. रितिका क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमात दिसते, पण जेव्हा जेव्हा पापाराझींना ती स्पॉट होते, तेव्हा तिच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर रंगते. ग्लॅमरस कुटुंबाचा भाग असूनही रितिकाने मीडियाला आपल्यापासून दूर ठेवणे पसंत केले आहे.