'धुरंधर'च्या यशामुळे रणवीर सिंगने सोडला नाही 'डॉन ३', समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:34 IST2025-12-25T09:32:39+5:302025-12-25T09:34:16+5:30

Ranveer Singh :'धुरंधर'च्या यशानंतर अशा अफवा पसरल्या आहेत की रणवीर सिंगने स्वतःला 'डॉन ३' पासून वेगळे केले आहे. मात्र, आता एका नवीन अपडेटनुसार या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

Ranveer Singh did not leave 'Don 3' due to the success of 'Dhurandhar', the real reason revealed | 'धुरंधर'च्या यशामुळे रणवीर सिंगने सोडला नाही 'डॉन ३', समोर आलं खरं कारण

'धुरंधर'च्या यशामुळे रणवीर सिंगने सोडला नाही 'डॉन ३', समोर आलं खरं कारण

फरहान अख्तरचा बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'डॉन ३' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगबाबत अनेक अडथळे येत आहेत. कधी अभिनेत्री मिळत नाहीये, तर कधी इतर काही समस्या, ज्यामुळे फरहान या प्रोजेक्टबाबत गंभीर नसल्याचे बोलले जात होते. आता 'धुरंधर'च्या यशानंतर अशा अफवा पसरल्या आहेत की रणवीर सिंगने स्वतःला 'डॉन ३' पासून वेगळे केले आहे. मात्र, आता एका नवीन अपडेटनुसार या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. 

एका नवीन रिपोर्टनुसार, रणवीर सिंगने 'डॉन ३' सोडलेला नाही. 'इंडिया टुडे'ने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, "वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. सर्वात आधी म्हणजे, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी रणवीरला 'डॉन ३' ची ऑफर तेव्हा दिली होती, जेव्हा त्याने सलग तीन मोठे फ्लॉप चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांनी 'बैजू बावरा'चा गाशा गुंडाळल्यानंतरही निर्माते रणवीरच्या पाठीशी उभे राहिले, कारण त्यावेळी त्याला फारसा यशस्वी अभिनेता मानले जात नव्हते."

रणवीरसाठी होती मोठी संधी

सूत्राने पुढे सांगितले की, "'डॉन ३' ही अत्यंत लोकप्रिय फ्रँचायझी आहे आणि रणवीर फक्त शाहरुख खानचीच नाही, तर अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांची जागा घेणार होता. कोणत्याही अभिनेत्यासाठी ही एक स्वप्नवत भूमिका आहे." फरहानने 'धुरंधर' रिलीज होण्यापूर्वीच रणवीरवर विश्वास दाखवला होता, याबद्दल सूत्र म्हणाले, "फरहान हा एकमेव चित्रपट निर्माता होता ज्याने रणवीरवर विश्वास ठेवला, जेव्हा इतर सर्व मागे हटले होते. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा धुरंधर प्रदर्शितही झाला नव्हता."

काय आहे खरं कारण?

अफवांचे अधिक स्पष्टीकरण देताना सूत्राने सांगितले की, रणवीरचे चित्रपटातून बाहेर पडणे हे 'धुरंधर'च्या यशाशी संबंधित नाही. त्याने वैचारिक मतभेदामुळे 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्मात्यांसोबत मागण्यांवरून झालेल्या मतभेदांचा परिणाम होता, स्वेच्छेने घेतलेला निर्णय नाही. अद्याप रणवीर सिंग किंवा प्रॉडक्शन टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही, रणवीरचे अशा प्रकारे चित्रपट सोडणे हा एक मोठा महत्त्वाचे वळण मानले जात आहे, कारण या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये यापूर्वीच अनेक बदल झाले आहेत.

Web Title : 'धुरंधर' की सफलता से रणवीर सिंह ने 'डॉन 3' नहीं छोड़ी।

Web Summary : अफवाहों के बावजूद, रणवीर सिंह ने 'डॉन 3' नहीं छोड़ी है। उन्हें फ्लॉप के बाद भी रोल मिला। 'धुरंधर' की सफलता नहीं, रचनात्मक मतभेदों के कारण उनका निर्णय हुआ। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।

Web Title : Ranveer Singh didn't quit 'Don 3' due to 'Dhurandhar' success.

Web Summary : Despite rumors, Ranveer Singh hasn't left 'Don 3'. He was offered the role even after flops. Creative differences, not 'Dhurandhar's success, led to his decision. Official confirmation is awaited.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.