रणवीर म्हणाला, माझे लग्न एका नॉनस्टॉप पार्टीसारखे असावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 18:14 IST2016-11-24T17:30:22+5:302016-11-24T18:14:58+5:30

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग आपल्या लग्नासाठी फारच उत्सूक असलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी माझ्या लग्नाची वेळ जवळ आली आहे असे ...

Ranveer said, my wedding should be like a nonstop party | रणवीर म्हणाला, माझे लग्न एका नॉनस्टॉप पार्टीसारखे असावे

रणवीर म्हणाला, माझे लग्न एका नॉनस्टॉप पार्टीसारखे असावे

लिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग आपल्या लग्नासाठी फारच उत्सूक असलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी माझ्या लग्नाची वेळ जवळ आली आहे असे सांगितले होते. आता यावर आणखी खुलासा करताना ‘माझे लग्न एका नॉनस्टॉप पार्टी सारखे असावे’ असे तो म्हणतोय. 

दिग्दर्शक आदित्य चोपडा यांच्या आगामी ‘बेफिक्रे’ या चित्रपटातील विवाह गीत ‘खुलके ढुलके’ रिलीज करण्यात आले यावेळी तो मीडियाशी बोलत होता. रणवीर म्हणाला, ‘माझे लग्न एखाद्या नॉन स्टॉप पार्टी सारखे असावे. लग्न सोहळा पार्टीसारखा वाढत जाणारा असावा. माझ्या लग्नात उपस्थितांनी भरपूर मजा करावी, यावेळी प्रत्येकाने नाचावे. माझ्या जवळ त्यावेळी भरपूर पैसा जमा झाल्यास मी आपले लग्न एखाद्या बेटावर करेन. तेथे मी जबरदस्त पार्टीचे आयोजन करेन, तेथे सर्व लोक डान्स करून शकतील.’ मी आपल्या जवळच्या सर्व लोकांना यासाठी आमंत्रित करणार आहे असेही रणवीर म्हणाला. ‘बेफिके्र’ या चित्रपटाबद्दल तो म्हणाला, एखाद्या पिरीएड चित्रपटाच्या तुलनेत एखाद्या रोमाँटिक चित्रपटात काम करणे कठीण आहे.

Ranveer Sing says, My Wedding would be A Non Stop Party

यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान रणवीर सिंग याने ‘माझे बायोलॉजिकल क्लॉक मला लग्न करण्याचे वेळ आली असल्याचे संकेत देत आहे’ असे सांगितले होते. रणवीरचे नाव अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याशी जोडण्यात येते. दोघांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ व ‘बाजीराव-मस्तानी’ हे चित्रपट एकत्र केले असून आगामी पद्मावतीमध्येही दोघांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

 यशराज बॅनरच्या आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफिके्र’ हा चित्रपट रोमाँटिक कॉमेडी चित्रपटात रणवीर सिंग व वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बेफि क्रे’ हा चित्रपट काळानुसार बदलणारे प्रेम संबधांवर आधारित असल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Ranveer said, my wedding should be like a nonstop party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.