...अखेर रणवीरने ‘त्या’ जाहीरातीबद्दल मागितली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 18:11 IST2016-11-26T18:11:05+5:302016-11-26T18:11:05+5:30

‘बेफिक्रे’ बॉय रणवीर सिंग त्याच्या हटके लुक, कुल अवतारासाठी ओळखला जातो. मात्र, हा हॅण्डसम हंक आता चांगलाच कात्रीत अडकलाय. ...

Ranveer finally apologized for the 'that' advertisement! | ...अखेर रणवीरने ‘त्या’ जाहीरातीबद्दल मागितली माफी!

...अखेर रणवीरने ‘त्या’ जाहीरातीबद्दल मागितली माफी!

ेफिक्रे’ बॉय रणवीर सिंग त्याच्या हटके लुक, कुल अवतारासाठी ओळखला जातो. मात्र, हा हॅण्डसम हंक आता चांगलाच कात्रीत अडकलाय. झालं असं की, ‘त्या’ जाहीरातप्रकरणाबद्दल त्याला सोशल मीडियावर माफी मागावी लागलीय. 

होर्डिंगवर लावण्यात आलेल्या ‘त्या’ जाहीरातीत त्याने एका मुलीला त्याच्या खांद्यावर उचलले आहे. ‘डोन्ट होल्ड बॅक़ टेक युअर वर्क होम’ या कॅप्शनसह हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. अनेकांनी या कॅप्शन आणि फोटोवर आक्षेप घेतला. शेवटी त्याने या मुद्यावर माफी मागणंच पसंत केलं.

                            

तो म्हणाला,‘ ती जाहीरात ज्या कंपनीने डिझाईन केली ते करत असताना त्यांना त्याबद्दलचे स्वातंत्र्य द्यायलाच हवे. पण, मला असं वाटतं की, त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. या सर्वांत कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. आम्ही काही क्षणातच सर्व शहरातील होर्डिंग्ज काढून टाकून तिथे नव्या क्रि एटिव्हिटीसह ते लावण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी स्वत: महिलांचा खुप आदर करतो. जाहीरातीच्या माध्यमातून माझी काही चुक झाली असेल तर मी त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो.

Web Title: Ranveer finally apologized for the 'that' advertisement!