रानू मंडलला हिमेशनं दिलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:00 PM2019-08-27T20:00:00+5:302019-08-27T20:00:00+5:30

हिमेश रेशमियानं त्याच्या चित्रपटातील गाणे गाण्यासाठी राणू मंडलला दिलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.

Ranu Mandal took such fee for her first song, you will be shocked to hear | रानू मंडलला हिमेशनं दिलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्हाला बसेल धक्का

रानू मंडलला हिमेशनं दिलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्हाला बसेल धक्का

googlenewsNext

एका गाण्यामुळे रात्रीच्या रात्री लोकप्रिय झालेल्या रानू मंडलने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल. रानू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीनं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. मात्र आता या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेश दिलेल्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. तो आकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल.

रानू पश्चिम बंगालमधील रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन जीवन व्यतित करत होती. तिला बऱ्याच लोकांनी गाणं गाताना पाहिलं होतं. मात्र लोक नेहमी तिच्याकडे कानाडोळा करत होते. मात्र एका व्हिडिओमुळे रानूला हिमेशने त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. हिमेशच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे हॅप्पी हार्डी अँड हीर. यात रानूने तेरी मेरी कहानी असं बोल असणारं गाणं गायलं आहे. हिमेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात रानू स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करते आहे. तिच्यासोबत हिमेश रेशमिया स्वतः उभा असून तिला मार्गदर्शन करताना दिसतो आहे.


हिंदुस्तान डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, रानू मंडलला पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने जवळपास ६ ते ७ लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले मानधन रानू स्वीकारात नव्हती.  हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले.

इतकचं नाही तर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असंही सांगितलं. ‘तुम्हाला बॉलिवूडमध्ये स्टार होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही,’ अशा शब्दात प्रोत्साहन दिलं.

Web Title: Ranu Mandal took such fee for her first song, you will be shocked to hear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.