राणीने घेतली महाराष्ट्रातील या महिला अधिकाऱ्याची भेट, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 12:55 IST2019-11-26T12:40:54+5:302019-11-26T12:55:00+5:30

आदित्य चोप्रा निर्मित आगामी मर्दानी 2 मध्ये राणी  मुखर्जी झळकणार आहे.

Rani mukherjee meets maharashtra lady supercop archana tyagi | राणीने घेतली महाराष्ट्रातील या महिला अधिकाऱ्याची भेट, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

राणीने घेतली महाराष्ट्रातील या महिला अधिकाऱ्याची भेट, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

राणीच्या मुखर्जी हिच्या बहुप्रतिक्षित असलेल्या आगामी, मर्दानी 2 मध्ये ती पुन्हा एकदा निर्भीड आणि वचनबद्ध अशी पोलिस अधिक्षक शिवानी शिवाजी रॉय हिच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवणारा असून त्यात राणी पद्धतशीरपणे महिलांना शिकार बनवून त्यांच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार करणाऱ्या सिरीयल रेपिस्टमागे ससेमिरा लावताना दिसणार आहे. भारतात बालगुन्हेगारांचा हिंसक गुन्ह्यांकडे वाढणारा कल मर्दानी 2 मध्ये मांडण्यात आला आहे. या माध्यमातून युवतींवर असलेल्या भीतीच्या सावटाला निश्चितपणे वाचा फुटणार आहे.

या सिनेमाच्या प्रचारात राणी सक्रियपणे सहभाग झाली आहे आणि ती भारतभर या सिनेमामधून मिळणाऱ्या  संदेशाचा प्रसार करत आहे. अलीकडे किशोरवयीनांचा गुन्ह्यांमधला सहभाग वाढला असून त्यावर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने राणीने अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि एस. आर. पी. एफ. च्या महाराष्ट्र प्रमुख दबंग अधिकारी अर्चना त्यागी त्यांची मुलाखत घेतली. अर्चना यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास, जिद्दीने झपाटून काम करण्याची त्यांची वृत्ती तसेच कार्यालयीन काम व आयुष्याचा मेळ याविषयी चर्चा झाली.


आदित्य चोप्रा निर्मित आगामी मर्दानी 2 मध्ये राणी  मुखर्जी झळकणार आहे. तिचा अगोदरचा हिचकी ग्लोबल ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याने जगभर 250 कोटींचा गल्ला कमावला होता. 13 डिसेंबरपासून मर्दानी 2 चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Rani mukherjee meets maharashtra lady supercop archana tyagi