"त्या चित्रपटानंतर घटस्फोट वाढले" गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीची हजेरी, म्हणाली,...

By समीर नाईक | Published: November 26, 2023 03:34 PM2023-11-26T15:34:08+5:302023-11-26T15:37:04+5:30

अनेक जे लोक फक्त भावनेअभावी संसार करत होते, त्यांनी घटस्फोट घेतला.

Rani Mukherjee attends Goa International Film Festival says her voice is her identity | "त्या चित्रपटानंतर घटस्फोट वाढले" गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीची हजेरी, म्हणाली,...

"त्या चित्रपटानंतर घटस्फोट वाढले" गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीची हजेरी, म्हणाली,...

चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना माझ्या अवाजाबाबत अनेकांना शंका होती, की माझ्या आवाजामुळे चित्रपट फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला अनेकदा माझा आवाज डब करण्यात आला, पण नंतर माझा आवाजच माझी ओळख झाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी केले.  इफ्फी दरम्यान कला अकादमी येथे आयोजित मास्टरक्लास सत्रात अभिनेत्री राणी मुखर्जी उपस्थित होते.

खरंतर मला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, पण माझ्या आईला मला अभिनेत्री करायचे होते. त्यामुळे मी या क्षेत्रात आले. मला अजूनही आठवते की जेव्हा माझा पहिला मुहूर्त शॉट होता, तेव्हा मी खूप गडबडले होते. व्यासपीठाचा मला अनुभव नव्हता हेच मूळ कारण होते. तसेच मला बोलताना मधेच अडखळण्याची सवय होती. पण मी जेव्हा माझा डायलॉग घेतला, तेव्हा मला जो प्रतिसाद मिळाला त्यातून मी भारावून गेले. आणि त्या क्षणी मला वाटले की माझा जन्म चित्रपटांसाठीच झाला आहे, असे मुखर्जी यांनी पुढे सांगितले.

अभिनेत्याने नेहमीचं अष्टपैलू असणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी आम्हाला वेगळी भूमिका साकारवावी लागते, त्यामुळे जोपर्यंत आम्ही अष्टपैलू अभिनेता बनत नाही, तोपर्यंत त्या भूमिकेला आम्ही न्याय देऊ शकत नाही. तसेच अष्टपैलू कलाकार असण्याचा आणखी एक फायदा म्हणजे लोकांना देखील ते आवडते आणि कलाकार म्हणून तुम्ही देखील ती भूमिका आवडायला लागते, असे मुखर्जी यांनी पुढे सांगितले. 

...या चित्रपटानंतर घटस्फोट वाढले

मला वेगळे चित्रपट करायला खूप आवडतात. खासकरून शाहरुख खान यांच्यासोबत काम करण्यास मला सोपे होते. माझा जेव्हा कभी अलविदा ना केहना चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांमध्ये तो एवढा प्रभावी ठरला की त्या नंतर देशातील घटस्फोट घेण्याची संख्या वाढली. अनेक जे लोक फक्त भावनेअभावी संसार करत होते, त्यांनी घटस्फोट घेतला. आणि अनेकजण यातून आनंदी आहेत, ही त्यातील चांगली गोष्ट ठरली, असे राणी मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Rani Mukherjee attends Goa International Film Festival says her voice is her identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.