राणी मुखर्जीनं दिलीप प्रभावळकरांचं केलं कौतुक, मराठी सिनेमात काम करण्याबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:00 IST2026-01-21T17:00:02+5:302026-01-21T17:00:38+5:30

राणीनं लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं कौतुक करत मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली केली आहे.

Rani Mukerji Praises Dilip Prabhavalkar Dashavatar Says Wants To Work In Marathi Films | राणी मुखर्जीनं दिलीप प्रभावळकरांचं केलं कौतुक, मराठी सिनेमात काम करण्याबद्दल म्हणाली...

राणी मुखर्जीनं दिलीप प्रभावळकरांचं केलं कौतुक, मराठी सिनेमात काम करण्याबद्दल म्हणाली...

बॉलिवूडमध्ये अशी काही मोजकीच नावं आहेत, ज्यांनी ९० च्या दशकापासून आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. राणी मुखर्जी हे त्यापैकी एक मोठं नाव. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीसाठी ओळखली जाणारी राणी सध्या तिच्या 'मर्दानी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच राणीनं लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं कौतुक करत मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली केली आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत राणीला विचारण्यात आलं की, तिला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का? त्यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत राणी म्हणाली, "मी स्वतःला महाराष्ट्रीयनच मानते. माझं संपूर्ण बालपण मुंबईत गेलं आहे. मराठी सिनेमांचे आशय-विषय नेहमीच उत्तम असतात. सचिन कुंडलकर यांचा 'अय्या' हा सिनेमा माझ्यासाठी नेहमीच स्मरणीय राहील".

यावेळी राणीने मराठीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं कौतुक केलं. "मला दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' पाहायचाच आहे. मी त्यांच्यासोबत काम केलं असून त्यांच्याकडून मला नेहमीच कामाची प्रेरणा मिळते", असं ती म्हणाली. मराठी चित्रपटांचा आशय आणि मांडणी पाहून राणीने आता आदित्य चोप्रा यांच्यासमोर एक मोठा प्रस्ताव मांडण्याचे ठरवलंय. "यशराज फिल्म्सने (YRF) मराठी चित्रपटांची निर्मिती करावी, असा प्रस्ताव मी स्वतः आदित्य चोप्रासमोर मांडणार आहे" असं ती म्हणाली.

 'मर्दानी ३' कधी प्रदर्शित होणार?

'मर्दानी'मध्ये मानवी तस्करी आणि 'मर्दानी २' मध्ये सिरीयल रेपिस्टची मानसिकता दाखवल्यानंतर, 'मर्दानी ३' ची कथा देखील सत्य घटनांवर आधारित आहे. राणी मुखर्जीचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट याच महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title : रानी मुखर्जी ने दिलीप प्रभावळकर की प्रशंसा की, मराठी फिल्मों में काम करने की इच्छा जताई

Web Summary : रानी मुखर्जी ने दिलीप प्रभावळकर की प्रशंसा की और मराठी सिनेमा में काम करने की इच्छा व्यक्त की, क्योंकि वह महाराष्ट्र से जुड़ाव महसूस करती हैं। उन्होंने यश राज फिल्म्स को मराठी फिल्में बनाने का प्रस्ताव रखने की बात कही।

Web Title : Rani Mukerji Praises Dilip Prabhavalkar, Wants to Act in Marathi Films

Web Summary : Rani Mukerji admires Dilip Prabhavalkar and expressed her desire to work in Marathi cinema, feeling a connection to Maharashtra. She will propose that Yash Raj Films produce Marathi movies, inspired by the quality of Marathi cinema.