Randeep Hooda : घोडेस्वारी करताना बेशुद्ध पडला रणदीप हुड्डा; अभिनेत्याला झाली गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:05 IST2023-01-13T19:00:37+5:302023-01-13T19:05:14+5:30

बेशुद्ध अवस्थेत रणदीप हुड्डाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या गुडघ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Randeep hooda seriously injured fainted while horse riding cat web series actor admitted in mumbai hospital | Randeep Hooda : घोडेस्वारी करताना बेशुद्ध पडला रणदीप हुड्डा; अभिनेत्याला झाली गंभीर दुखापत

Randeep Hooda : घोडेस्वारी करताना बेशुद्ध पडला रणदीप हुड्डा; अभिनेत्याला झाली गंभीर दुखापत

चित्रपट अभिनेता रणदीप हुडाला उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार घोडेस्वारी करताना तो बेशुद्ध पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्यासोबत अशीच घटना घडली होती. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.आता त्याला डॉक्टरांनी  पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आला आहे.

अ‍ॅक्शन सीन करताना झाली होती दुखापत
गेल्या वर्षीही रणदीप हुड्डा एक अ‍ॅक्शन सीन करताना जखमी झाला होता. तो सलमान खानच्या राधे या चित्रपटाचे शूटिंग करत होता. यादरम्यान, अ‍ॅक्शन सीन करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आणि त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. इन्स्पेक्टर अविनाशच्या शूटिंगदरम्यान त्याची शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, रणदीप हुड्डाने हॉस्पिटलमधील फोटोही शेअर केले होते आणि त्याच्या तब्येतीची माहितीही दिली होती.

आता रणदीप हुड्डा त्याच्या आगामी 'सावरकर' चित्रपटाच्या तयारीला लागला असून त्यासाठी तो आपले वजन कमी करत आहे. सावरकरमध्ये रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो 22 किलो वजन कमी करत आहे.  घोड्यावरून पडल्यामुळे त्याच्या गुडघ्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असं म्हटलं जातंय.

नुकतीच रणदीप हुडाची वेब सीरिज कॅटही रिलीज झाली. यातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. यामध्ये त्याने ड्रग्ज पेडलरची भूमिका साकारली होती, जो गुप्तहेरही होतो. रणदीप हुड्डामे  अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Randeep hooda seriously injured fainted while horse riding cat web series actor admitted in mumbai hospital