'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुडाने घेतली प्रचंड मेहनत, फोटो पाहून येईल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 06:56 PM2024-03-18T18:56:23+5:302024-03-18T18:57:32+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी रणदीप हुड्डाने १८ दिवसात ३० किलो वजन घटवलं.

Randeep Hooda has put a lot of effort into the movie for swatantrya veer savarkar | 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुडाने घेतली प्रचंड मेहनत, फोटो पाहून येईल अंदाज

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुडाने घेतली प्रचंड मेहनत, फोटो पाहून येईल अंदाज

अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. २२ मार्चला सिनेमा प्रदर्शित होतोय. सध्या जिकडे तिकडे या चित्रपटाची चर्चा आहे. रणदीप स्वत:च सिनेमाचा दिग्दर्शक, निर्माताही आहे. या सिनेमासाठी रणदीपने तब्बल ३० किलो वजन कमी केलं. शिवाय घरंही विकल्याच खुलासा एका मुलाखतीत केला. वजन कमी केल्यानंतर त्याने बदललेल्या लूकमधील फोटो शेअर केला. हा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी रणदीप हुड्डाने १८ दिवसात ३० किलो वजन घटवलं. या सिनेमासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली असल्याचं या फोटोवरुन जाणवतं. 'काला पानी' असं कॅप्शन त्याने फोटोसोबत लिहिलं आहे. रणदीप म्हणतो, "माझी बहीण न्यूट्रिशनिस्ट आहे. तिने सांगितलेल्या गोष्टी मी आहारात फॉलो केल्या. १६ ते २० मी उपाशी राहायचो. फक्त पाण्यावर असायचो. दूधही नाही. केवळ ब्लॅक टी, ग्रीन टीवर राहायचो. १६ तासांपेक्षा जास्त जेव्हा तुम्ही उपाशी राहता तेव्हा तुमचं शरीर आपोआप डिटॉक्स व्हायला लागतं. त्यामुळे एक दोन दिवस तुम्ही उपास ठेवायला पाहिजे.मी ड्रायफ्रुट्स खायचो. कोकोनट
 ऑईल, काजू, आणि बदामाचं तूप असा माझा आहार असायचा."

रणदीपचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. 'हाच खरा अभिनेता', 'राष्ट्रीय पुरस्काराची तयारी कर' अशा कमेंट्स त्याच्या फोटोवर आल्या आहेत. मराठमोळी अंकिता लोखंडेही 'वीर सावरकर' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. २२ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हिंदीबरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: Randeep Hooda has put a lot of effort into the movie for swatantrya veer savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.