Randeep Hooda: रणदीप हुड्डा गेल्या ८ महिन्यांपासून या बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? कोण आहे ती, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 22:54 IST2022-03-20T22:52:26+5:302022-03-20T22:54:00+5:30
Randeep Hooda News: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या पर्सनल लाईफला तितकंस लाईम लाईटमध्ये आणत नाही. मात्र तरीही तो कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. आता मीडियामध्ये त्याच्या नव्या अफेअरची चर्चा आहे.

Randeep Hooda: रणदीप हुड्डा गेल्या ८ महिन्यांपासून या बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? कोण आहे ती, पाहा...
मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या पर्सनल लाईफला तितकंस लाईम लाईटमध्ये आणत नाही. मात्र तरीही तो कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. आता मीडियामध्ये त्याच्या नव्या अफेअरची चर्चा आहे. मिळत असलेल्या मुळची मणिपूरची मॉडेल असलेल्या लीन लैशराम हिला रणदीप हुड्डा डेट करत आहे. तिने ओम शांती ओम आणि मेरी कोम या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मात्र रणदीप हुड्डा हा सध्या लिव्ह इनमध्ये राहतोय की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण या दोघांनीही याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र हे दोघेही गेल्या आठ महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही काळापूर्वी लीनने तिचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रणदीप तिच्यासोबत दिसत होता. यावर काही नेटिझन्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वर्क फ्रंटचा विचार केल्यास रणदीप हुड्डाने हायवे, जन्नत २, सरबजीत यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर लीन लैशराम ही एक यशस्वी मॉडेल आहे. तिने रंगून, ओम शांती ओम आणि मेरी कोम यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.