रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचं रिसेप्शन थाटामाटात पडलं पार, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 19:33 IST2023-11-30T19:31:07+5:302023-11-30T19:33:09+5:30
बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा आणि लीन लैश्राम 29 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली.

रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचं रिसेप्शन थाटामाटात पडलं पार, फोटो व्हायरल
बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा आणि लीन लैश्राम 29 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली. मणिपूरच्या इंम्फाळमध्ये पारंपारिक मणिपुरी पोशाखात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर नवविवाहित जोडप्यासाठी रिसेप्शनचेही आयोजन करण्यात केले होते, त्याची एक झलक आता समोर आली आहे.
रिसेप्शनसाठी लीन लैश्रामने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर रणदीप हुड्डाने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. या लूकमध्ये तो खूपच देखणा दिसत होता. या रिसेप्शनचा व्हिडीओ रणदीप हुड्डाची बहीण डॉ. अंजली हुड्डा हिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. शिवाय, दोघे मुंबईत देखील रिसेप्शन देणार असण्याची शक्यता आहे.
रणदीप आणि लीन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती मॉडेल, अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे. तिने प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात काम केलं आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली.