भन्साळीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोणसोबत रणवीर नाही तर 'हा' सुपरस्टार करु शकतो रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:53 IST2018-08-31T12:41:22+5:302018-08-31T12:53:54+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या ऐतिहासिक सिनेमांसाठी ओळखले जातात. यावर्षी त्यांचा पद्मावत हा सिनेमा रिलीज झाला आहे.

Ranbir Singh is not with Deepika Padukone in the upcoming Bhansali film, but this superstar can do romance | भन्साळीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोणसोबत रणवीर नाही तर 'हा' सुपरस्टार करु शकतो रोमांस

भन्साळीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोणसोबत रणवीर नाही तर 'हा' सुपरस्टार करु शकतो रोमांस

ठळक मुद्देदीपिका पादुकोणसोबत रणवीर सिंगला कास्ट करणार नाहीतपद्मावतनंतर भन्साळींनी आपल्या आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या ऐतिहासिक सिनेमांसाठी ओळखले जातात. यावर्षी त्यांचा 'पद्मावत हा सिनेमा रिलीज झाला आहे. जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यात मुख्य भूमिकेत दीपिका पादुकोण, रणबीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या होत्या. भन्साळी आता त्यांचा आगामी सिनेमादेखील दीपिका पादुकोणला घेऊन तयार करणार आहेत. मात्र यावेळी ते दीपिका पादुकोणसोबत रणवीर सिंगला कास्ट करणार नाहीत. तर दीपिकाच्या अपोझिट सलमान खानला कास्ट करण्याची त्यांची इच्छा आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार पद्मावतनंतर भन्साळींनी आपल्या आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. रिपोर्टनुसार भन्साळी आता 'इंशा अल्लाह' नावाचा सिनेमा तयार करतायेत. भन्साळींच्या आगामी सिनेमात जर त्यांनी दीपिकाच्या अपोझिट सलमानला कास्ट केले तर पहिल्यांदाच दीपिका आणि सलमान एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.   

याआधी दीपिका आणि सलमान दोघांनी भन्साळींच्या सिनेमात काम केले आहे. सलमानने 'खामोशी', 'हम दिल दे चुके सनम', 'सांवरिया' अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. तर दीपिकाच्या करिअरमधले तीन सुपरहिट सिनेमा डीप्पीला भन्साळींनी दिले आहेत, 'गोलियों की रासलीला रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'. सध्या सलमान खान भारतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे त्यानंतर तो दबंग 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. भारत' सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे. दीपिकाबाबत बोलायचे झाले तर सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये दीपिका बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचे समजतेय. 

Web Title: Ranbir Singh is not with Deepika Padukone in the upcoming Bhansali film, but this superstar can do romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.