'अॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 19:28 IST2024-06-18T19:27:53+5:302024-06-18T19:28:23+5:30
Animal Park : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'अॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ॲनिमलच्या यशानंतर निर्मात्यांनी दुसरी सक्सेस पार्टी जाहीर केली होती. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अभिनेता सौरभ सचदेवा याचीही महत्त्वाची भूमिका होती. दुसऱ्या भागातही तो दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ॲनिमल पार्क रिलीज व्हायला अजून वेळ लागू शकतो.
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सौरभ सचदेवाने सांगितले की रणबीर कपूरच्या ॲनिमल पार्कच्या निर्मितीला उशीर होऊ शकतो. अभिनेता सध्या रामायणच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो म्हणाला की, या विषयावर निर्माते आणि दिग्दर्शकाशी अद्याप चर्चा झालेली नाही. संदीप रेड्डी वांगा म्हणाले की, अजून वेळ आहे, मी आणखी एक चित्रपट (प्रभास की स्पिरिट) बनवत आहे आणि रणबीर रामायण करत आहे, त्यामुळे खूप वेळ लागेल.
सौरभने सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, ती २०२६ किंवा २०२७ मध्ये असू शकते. सौरभने असेही सांगितले की, ही कथा लिहिली गेली आहे की अजूनही त्याच्या ढोबळ मांडणीत आहे हे मला अद्याप माहित नाही.
'ॲनिमल' सिनेमाबद्दल
रश्मिका मंदाना 'ॲनिमल'मध्ये लीड लीडमध्ये होती. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटात बॉबीची छोटी भूमिका होती, पण त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना खूप प्रभावित केले. अभिनेत्री तृप्ती डिमरी हिनेही या चित्रपटातील तिच्या छोट्या भूमिकेने प्रभावित केले. तृप्तीला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला.
वर्कफ्रंट
सौरभ सचदेवाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो जाने जान, हड्डी आणि हाऊसफुल ४ मध्ये दिसला होता. आता तो बॅड कॉपमध्ये दिसणार आहे.