आलिया भट या कारणामुळे झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:34 PM2019-04-01T13:34:48+5:302019-04-01T14:01:23+5:30

झी सिने पुरस्कार सोहळा रणबीर कपूरसाठी खूपच खास होता. कारण या पुरस्कार सोहळ्यात रणबीरला आलियाकडून पुरस्कार देण्यात आला.

Ranbir Kapoor's acceptance speech at Zee Cine Awards 2019 for Best Actor makes Alia Bhatt emotional | आलिया भट या कारणामुळे झाली भावुक

आलिया भट या कारणामुळे झाली भावुक

googlenewsNext
ठळक मुद्देपुरस्कार स्वीकारण्यासाठी रणबीर स्टेजवर आल्यानंतर त्याने आलियाला किस केले आणि आलिंगन दिले. यावेळी रणबीर चांगलाच भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळत होते.

मार्च-एप्रिल महिन्यात आपल्याला अनेक पुरस्कार सोहळे पाहायला मिळतात. या पुरस्कार सोहळ्यांची प्रेक्षक आतुरतेने वर्षभर वाट पाहात असतात. कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. तसेच कोणती अभिनेत्री, कोणता अभिनेता बाजी मारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. झी सिने हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरला संजू या चित्रपटासाटी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भटला राझी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले. 

रणबीर कपूरसाठी हे वर्षं खूपच महत्त्वाचे आहे. त्याला संजू या चित्रपटातील भूमिकेसाठी आतापर्यंत झी सिने पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. झी सिने पुरस्कार सोहळा तर त्याच्यासाठी खूपच खास होता. कारण या पुरस्कार सोहळ्यात रणबीरला आलियाकडून पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रणबीर स्टेजवर आल्यानंतर त्याने आलियाला किस केले आणि आलिंगन दिले. यावेळी आलिया चांगलीच भावुक झाली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळत होते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रणबीरने हा पुरस्कार त्याच्या आयुष्यातील दोन खास व्यक्तींना समर्पित केला. या दोन खास व्यक्ती म्हणजे रणबीरची आई नीतू सिंग कपूर आणि वडील ऋषी कपूर.

रणबीर आणि आलिया यांच्या नात्याला आता जवळजवळ वर्ष झाले आहे. त्यांना अनेक कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर ते चित्रीकरणाव्यतिरिक्त देखील एकमेकांसोबत नेहमीच वेळ घालवताना दिसतात. 

रणबीर कपूरने संजू या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यात आलेले चढ-उतार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. संजय दत्तची भूमिका रणबीरने अक्षरशः जगली होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण या चित्रपटात रणबीरचे हावभाव, देहबोली संजय दत्त सारखीच होती. रणबीरने या चित्रपटासाठी त्याच्या आवाजावर देखील प्रचंड मेहनत घेतली होती. याच चित्रपटातील भूमिकासाठी त्याला झी सिने पुरस्काराने गौरवण्यात आले.

Web Title: Ranbir Kapoor's acceptance speech at Zee Cine Awards 2019 for Best Actor makes Alia Bhatt emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.